घरताज्या घडामोडीविद्यार्थ्यांनी भरलेल्या बसचा ब्रेक झाला फेल अन्...; पुण्यातील धक्कादायक प्रकार समोर

विद्यार्थ्यांनी भरलेल्या बसचा ब्रेक झाला फेल अन्…; पुण्यातील धक्कादायक प्रकार समोर

Subscribe

विद्यार्थ्यांनी भरलेल्या बसचा ब्रेक फेल झाल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली. पुण्याच्या भोरमधील चौपाटी परिसरात ही घटना घडली. बसमध्ये एकूण ३४ विद्यार्थी होते. पुण्यातील बारामतीच्या मोरगावमधील एका खासगी क्लासच्या विद्यार्थ्यांना, सहलीसाठी घेऊन जात असलेल्या बसचे ब्रेक अचानक निकामी झाले.

विद्यार्थ्यांनी भरलेल्या बसचा ब्रेक फेल झाल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली. पुण्याच्या भोरमधील चौपाटी परिसरात ही घटना घडली. बसमध्ये एकूण ३४ विद्यार्थी होते. पुण्यातील बारामतीच्या मोरगावमधील एका खासगी क्लासच्या विद्यार्थ्यांना, सहलीसाठी घेऊन जात असलेल्या बसचे ब्रेक अचानक निकामी झाले. त्यानंतर ब्रेक निकामी झाल्याचे समजताच चालकाने चालत्या बसमधून उडी मारून चाकाखाली दगडं टाकून बस थांबवली. (Brake Fail Bus Of Students Going For A Trip To Pune Bhor Viral Video)

चालकाने दाखवलेल्या ह्या प्रसंगावधानामुळं मोठा अनर्थ टळला आहे. बस वरंधघाट मार्गे रायगड किल्ल्यावर विद्यार्थ्यांना सहलीसाठी घेऊन जात असताना पुण्याच्या भोरमधील चौपाटी परिसरात ही घटना घडली. या घटनेबाबत प्रत्यक्षदर्शी स्थानिकांनी दिलेली माहितीनुसार, मोरगावमधील एका खासगी क्लासच्या विद्यार्थ्यांना सहलीसाठी घेऊन निघालेल्या बसचे ब्रेक अचानक निकामी झाले. त्यानंतर चालकाने रस्त्यावरच्या नागरिकांना सावध केल आणि चालत्या बस मधून उडी मारली. त्यानंतर चाकाखाली दगडं टाकून बस थांबवली. चालकाने दाखवलेल्या या प्रसंगावधानामुळं मोठा अनर्थ टळला. ही सर्व घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

- Advertisement -

नेमकी घटना काय?

मोरगावमधील खासगी क्लासच्या ३४ विद्यार्थ्यांना सहलीसाठी घेऊन जात असलेल्या बसने मांढरदेवीचे दर्शन केले. त्यानंतर बस क्रमांक MH12 HC 9119 भोर वरंधघाट मार्गे रायगडला जात होती. त्यावेळी भोर चौपाटीजवळ बसचा ब्रेक एअर पाईप फुटल्याने बसचे ब्रेक निकामी झाले. दरम्यान, बसमधील सर्व विद्यार्थी सुखरूप आहेत.

- Advertisement -

याघटनेची माहिती मिळताच पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पोहचून चालक आणि विद्यार्थ्यांना धीर देत रस्त्यावर झालेली वाहतूक कोंडी सोडवून वाहतूक सुरळीत केली.


हेही वाचा – ‘मुंबईकरांनो सावध व्हा…’, संजय राऊतांचे आवाहन; नेमके प्रकरण काय?

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -