घरमहाराष्ट्रमुंबई महापालिकेचा आरोग्यमय अर्थसंकल्प, यशवंत जाधव यांची प्रतिक्रिया

मुंबई महापालिकेचा आरोग्यमय अर्थसंकल्प, यशवंत जाधव यांची प्रतिक्रिया

Subscribe

मुंबई : मुंबई महापालिकेचा सन 2023-24चा अंर्थसंकल्प महापालिकेचे प्रशासक इकबालसिंह चहल यांना अतिरिक्त आयुक्त पी. वेलारासू यांना सादर केला. हा अर्थसंकल्प आरोग्यमय असून वर्षभरात मुंबईकरांना नवीन प्रकल्प पूर्णत्वास आलेले दिसतील, अशी प्रतिक्रिया शिंदे गटाचे नेते आणि स्थायी समितीचे माजी अध्यक्ष यशवंत जाधव यांनी दिली.

या अर्थसंकल्पामध्ये वयाची तिशी पार केलेल्या व्यक्तींचा या अर्थसंकल्पात प्रामुख्याने विचार करण्यात आला आहे. घरोघरी जाऊन तपासणी करून मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचा आजाराचे निदान करण्यात येणार आहे, जेणेकरून भविष्यात यापासून मोठे आजार उद्भवू नयेत, यासाठी हे प्रयत्न आहेत, असेही यशवंत जाधव म्हणाले.

- Advertisement -

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील जनतेच्या आरोग्याचा विचार करून ज्या सूचना केल्या होत्या, त्यानुसार योजना जाहीर केल्या आहेत. त्यामुळे येत्या वर्षभरात 30 वर्षांवरील जनतेचे आरोग्य ठणठणीत राखण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

मुंबईकरांच्या आरोग्याचा दुसऱ्या बाजूनेही विचार करण्यात आला असल्याने त्याल आरोग्यमय अर्थसंकल्प म्हणता येईल. आज पर्यावरणातील बदलाला वायू आणि हवेचेही प्रदूषण कारणीभूत आहे. हे ध्यानी घेऊनच मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या सूचनेनुसार मुंबईचा प्रदूषण नियंत्रण कृती योजना जाहीर करण्यात आली आली आहे. याअंतर्गत मुंबई स्वच्छ हवा कार्यक्रम, धूळमुक्त मुंबईच्या दृष्टीकोनातून बांधकाम प्रकल्प, कचरा आदींकरता मार्गदर्शक तत्वे जाहीर करतानाच इलेक्ट्रीक बसेस आणि झाडे लावून पर्यावरणाचा समतोल राखत, मुंबईकरांना प्रदूषणामुळे होणाऱ्या आजारांपासून मुक्ती देण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे जाधव म्हणाले.

- Advertisement -

याशिवाय महापालिकेच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या गोरगरीब मुलांना स्वयंरोजगाराच्या दृष्टीकोनातून कौशल्य विकास अभ्यासक्रम उपलब्ध करून एकप्रकारे स्वावलंबी बनवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच बाळासाहेब शिवसेना पक्षाचे शिक्षणमंत्री, शहराचे पालकमंत्री दीपक केसरकर व उपनगराचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या सूचनांचा विचार करत कौशल्य विकासाचे धडे दिले जाणार आहेत. जेणेकरून गरीब मुलांचे पुढील शिक्षण अर्धवट राहिल्यास या शिक्षणाच्या आधारे त्यांना चार पैसे कमवता येऊ शकतात, असे त्यांनी सांगितले.

स्थायी समिती अध्यक्ष म्हणून मंजूर केलेल्या सन 2022-23चा अर्थसंकल्पासंदर्भातील सूचना आणि सुचविलेली विकासकामे यासाठी भरीव निधीची तरतूद केली आहे. तसेच चालू प्रकल्पांना गती देण्याचाही प्रयत्न केला जात आहे. वर्सोवा ते दहिसर मीरारोडपर्यंत हाती घेण्यात येणाऱ्या कोस्टल रोड प्रकल्पाबाबत मला विशेष आनंद झाला आहे. या कोस्टल रोडचे वरळीपर्यंतचे काम पूर्ण झाल्यांनतर पुढील प्रकल्प हाती घेतल्यामुळे मुंबईकरांचा प्रवासही सुसाट होणार आहे, असेही जाधव म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -