घरमहाराष्ट्रऐन निवडणुकीत शरद पवारांना धक्का; अभिजित पाटलांच्या साखर कारखान्याचे गोडाऊन सील

ऐन निवडणुकीत शरद पवारांना धक्का; अभिजित पाटलांच्या साखर कारखान्याचे गोडाऊन सील

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पंढरपूरचे नेते अभिजित पाटील यांच्या श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना लि., वेणूनगर-गुरसाळे, (ता. पंढरपूर, जि.सोलापूर) कारखान्याच्या 3 गोडाऊनला महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या अधिकाऱ्यांनी आज सील केले आहे.

पंढरपूर : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पंढरपूरचे नेते अभिजित पाटील यांच्या श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना लि., वेणूनगर-गुरसाळे, (ता. पंढरपूर, जि.सोलापूर) कारखान्याच्या 3 गोडाऊनला महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या अधिकाऱ्यांनी आज सील केले आहे. थकीत कर्जाप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि आमदार रोहित पवार हे सोलापूर जिल्ह्यात असताना ही जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. (Abhijit Patil’s Shree Vitthal Cooperative Sugar Factory’s godown seal)

राज्य सहकारी बॅंकेचे मुद्दल आणि त्यावरील व्याज असे एकूण 430 काेटी रुपये थकवल्याप्रकरणी राज्य सहकारी बॅंकेचे प्राधिकृत अधिकारी तथा सहाय्यक व्यवस्थापक कैलास घनवट यांच्या तक्रारीनुसार विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील आणि संचालक मंडळावर गुन्हा दाखल झाला होता. राज्य सहकारी बॅंकेच्या या कारवाईच्या विरोधात अभिजित पाटील हे पुणे येथील डीआरटी न्यायालयात सुनावणी सुरू होती. डीआरटी न्यायालयाने सुनावणीमध्ये कारवाईला दिलेली स्थगिती उठवली. त्यानंतर आज तातडीने राज्य सहकारी बँकेच्या अधिकाऱ्यांनी श्री विठ्ठल कारखान्यावर येऊन साखरेची सर्व गोदामे सील केली आहेत. पोलीस बंदोबस्तात साखर कारखाना जप्तीची कार्यवाही केली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Lok Sabha 2024: कितीही रडीचे डाव खेळा, आमचीच राष्ट्रवादी जनतेतून दणकून येणार; कोल्हेंनी दादांना डिवचले

बँकेच्या नोटीसीमध्ये काय? (What about the bank notice?)

गोडाऊनवर लावण्यात आलेल्या सीलमध्ये म्हटले आहे की, वेणूनगर-गुरसाळे (ता. पंढरपूर) येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना लि., ची चल मालमत्तेचा (साखरसाठा) ताबा महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लि., मुंबई यांच्या मार्फत प्राधिकृत अधिकारी कैलास नामदेव घनवट, प्रादेशिक कार्यालय, पुणे यांनी सेक्युरिटायझेशन कायदा 2002, कलम 13 (4) अन्वये तसेच डी. आर.टी कोर्ट, पुणे दावा क्र.एस.ए.62/2024 मध्ये 25 एप्रिल 2024 रोजी झालेल्या सुनावणी मध्ये न्यायालयाने महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या, सरफेसी कायद्यान्वये कारखान्याच्या मालमत्ता जप्ती अनुषंगाने दिलेला स्टे उठविल्यानुसार व पुरक नियमाप्रमाणे 26 एप्रिल 2024 रोजी ताबा घेतला आहे. त्यामुळे सर्व कर्जदार आणि सामान्य जनतेस सूचित करण्यात येते की, सदर उपरोक्त कारखान्याच्या चल मालमत्तेचा कोणाशीही कुठल्याही प्रकारचा हस्तांतर/तबलीचा/ विक्रीचा व्यवहार करू नये, अशा प्रकारचे व्यवहार केल्यास ते बेकायदेशीर ठरतील यांची नोंद घ्यावी, असे आवाहन महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेकडून करण्यात आले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Maharashtra politics : विठ्ठल कारखान्यावरील जप्तीबद्दल रोहित पवार म्हणतात, सत्ता आल्यावर…

Edited By – Rohit Patil

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -