घरमहाराष्ट्रAbu Azmi: मी समाजवादी पक्ष सोडून...; अबू आझमींनी स्पष्टच सांगितलं

Abu Azmi: मी समाजवादी पक्ष सोडून…; अबू आझमींनी स्पष्टच सांगितलं

Subscribe

पक्ष श्रेष्ठींविषयी आपली कोणतीही नाराजी नसून, मी पक्ष सोडून कुठेही जाणार नाही. हवे तर मी स्टॅम्प पेपरवर लिहून देतो, असा निर्वाळा देत समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अबू आझमी यांनी मंगळवारी आपल्या पक्षांतराच्या चर्चेला पूर्णविराम दिला

मुंबई: पक्ष श्रेष्ठींविषयी आपली कोणतीही नाराजी नसून, मी पक्ष सोडून कुठेही जाणार नाही. हवे तर मी स्टॅम्प पेपरवर लिहून देतो, असा निर्वाळा देत समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अबू आझमी यांनी मंगळवारी आपल्या पक्षांतराच्या चर्चेला पूर्णविराम दिला. मात्र, आमच्या पक्षाने महाराष्ट्रात लोकसभेच्या किमान एक-दोन जागा लढवायला पाहिजे होत्या, अशी मागणी पक्षाच्या वरिष्ठांकडे केल्याची माहितीही त्यांनी दिली. (Lok Sabha Election 2024 Abu Azmi I will not left Samajwadi Party Abu Azmi clearly said)

अबू आझमी समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देऊन अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. रविवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल पटेल यांच्या भेटीनंतर आझमी राष्ट्रवादीत प्रवेश करणार या चर्चेने जोर धरला होता.

- Advertisement -

या पार्श्वभूमीवर आज प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना आपण पक्ष सोडून कुठेही जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, मी 1995 पासून समाजवादी पक्षात  कार्यरत आहे. महाराष्ट्रात आमच्या पक्षाचा विस्तार होत नसला तरी पक्षाची एक विचारधारा आहे. मी सत्तेच्या मागे नसून सत्यता आणि देशाच्या संविधानासोबत आहे. मला जायचे असते तर मी पत्रकार परिषद घेऊन नक्कीच सांगितले असते.

भेट घेतली म्हणजे पक्ष सोडणार …

मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच शरद पवार, प्रफुल्ल पटेल, अजित पवार यांनाही भेटतो. सगळ्यांशी आमच्या भेटीगाठी होत असतात. त्यामुळे ही लढाई फक्त एका विचारधारेशी आहे, आमचे एकमेकांमध्ये कोणतेही शत्रुत्व  नाही. आपण कामानिमित्त प्रफुल्ल पटेल यांची भेट घेतली होती. पण ही भेट भरदिवसा घेतली होती, बुरखा घालून भेट घेतली नव्हती.  भेट घेतली म्हणजे मी पक्ष सोडून जाणार असे होत नाही, असेही आझमी यांनी स्पष्ट केले.

- Advertisement -

कोण आहेत अबू आझमी?

अबू आझमी हे समाजवादी पक्षाचे नेते असून ते मुंबईतील मानखुर्द शिवाजीनगर या मुंबईतील मतदारसंघाचे ते आमदार आहेत. मानखुर्दमध्ये अबू आझमी यांची मोठी ताकद आहे. या मतदारसंघातून ते सलग तीनवेळा निवडून आले आहेत. याशिवाय ते राज्यसभेचे खासदार देखील राहिलेले आहेत. महाराष्ट्रात समाजवादी पक्ष वाढवण्यात अबू आझमी यांचा मोठा हातभार आहे.

(हेही वाचा: Lok Sabha 2024 : देशातील सर्वात श्रीमंत उमेदवार आंध्र प्रदेशात) 

Edited By- Prajakta Parab

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -