घरताज्या घडामोडीSwara Bhaskar : देवी-देवतांचे नाव घेऊन द्वेषाचं राजकारण करणे पाप; अभिनेत्रीचा मोदी...

Swara Bhaskar : देवी-देवतांचे नाव घेऊन द्वेषाचं राजकारण करणे पाप; अभिनेत्रीचा मोदी सरकारवर हल्लाबोल

Subscribe

मुंबई – काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेत अभिनेत्री स्वरा भास्कर सहभागी झाली. स्वराने केंद्रातील मोदी सरकारवर मणिपूरकडे दुर्लक्ष्य केल्याचा आरोप केला. इलेक्ट्रोल बॉण्डच्या माध्यमातून उद्योगपतींकडून वसूली केल्याचा आरोप केला. स्वरा भास्कर म्हणाली, आमच्या देवांच्या नावाने भाजप नेत्यांकडून जो द्वेष पसरवला जात आहे, ते पाप आहे. असं म्हणत स्वरा भास्करने मोदी सरकार आणि भाजपवर निशाणा साधला.

काँग्रेस नेते, पक्षाचे माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांनी मणिपूरपासून सुरु केलेल्या भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप शनिवारी मुंबईत चैत्यभूमी येथे झाला. आज (17 मार्च) इंडिया आघाडीच्या नेत्यांची मुंबईतील शिवाजी पार्क येथे सभा होणार आहे. या यात्रत सहभागी होत स्वरा भास्करने राहुल गांधी यांचे कौतूक केले.

- Advertisement -

स्वरा भास्कर म्हणाली, की राहुल गांधी मणिपूरपासून मुंबईपर्यंत चालले आहेत. त्यांनी साठ हजारांहून अधिक किलोमीटरची यात्रा करत जनतेच्या मनातील ऐकले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाव न घेता स्वरा भास्कर म्हणाली की, अनेक नेते असे आहेत जे आपल्याच मनाचं सांगत असतात, मात्र राहुल गांधी जनतेसोबत बोलत आहेत, त्यांच्या मनात काय आहे ते ऐकत आहे.

- Advertisement -

भारत जोडो यात्रा आणि न्याय यात्रा या सध्याच्या निराशेच्या काळात नवी आशा निर्माण करणाऱ्या असल्याचा दावा अभिनेत्री स्वरा भास्करने केला. भारत देश हा विविधतेने नटलेला सुंदर देश आहे, असे सांगतानाच स्वरा भास्कर म्हणाली, की आमच्यात कोणताच भेदभाव नाही. मी टिकली लावली आहे, कोणी नसेल लावली तरी त्यांचा आम्ही सन्मान करतो. कोण काय खाते, कोणी कसे कपडे घातले आहेत, याचा विचार न करता आम्ही सर्व भारत म्हणून एकत्र आहोत.

भाजपवर निशाणा साधताना स्वरा भास्कर म्हणाली की, सत्तेमध्ये असणाऱ्यांचे राजकारण हे द्वेषावर आधारलेले आहे. सामान्य लोकांना खोटं सांगून, त्यांना फूस लावून देशात द्वेषाचे राजकारण पसरवले जात आहे. हिंदू देवी देवतांचे नाव घेऊन द्वेष पसरवला जात आहे, लोकांना मारलं जात आहे. एक हिंदू म्हणून मला हे पाप वाटतं. या द्वेषाच्या विरोधात राहुल गांधी, काँग्रेस आणि अनेक सामाजिक कार्यकर्ते आज लढत आहेत. हे सध्याच्या काळात अतिशय गरजेचे आहे, असेही स्वरा भास्कर म्हणाली.

हेही वाचा : INDIA : राहुल गांधींच्या शिवतीर्थावरील सभेवरुन बावनकळेंचा ठाकरेंना सवाल; संजय राऊतांनी असे दिले उत्तर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -