घरक्राइमISIS Terrorist Pune : दहशतवाद्यांना अटक करण्यात एनआयएला यश; मुंबईत बॉम्बस्फोट घडवण्याचा...

ISIS Terrorist Pune : दहशतवाद्यांना अटक करण्यात एनआयएला यश; मुंबईत बॉम्बस्फोट घडवण्याचा होता कट

Subscribe

आयसिसच्या दहशतवाद्यांना अटक करण्यात राष्ट्रीय तपास यंत्रणेला (एनआयए) यश आल्याची माहिती समोर येत आहे. मुंबई, पुणे आणि गुजरातमधील महत्त्वाच्या शहरांत बॉम्बस्फोट घडविण्याचा कट या दहशतवाद्यांनी रचला होता. त्यासाठी पुण्यातील कोंढव्यातील बाँम्ब तयार करण्याचे प्रशिक्षण या दहशतवाद्यांनी घेतले होते.

आयसिसच्या दहशतवाद्यांना अटक करण्यात राष्ट्रीय तपास यंत्रणेला (एनआयए) यश आल्याची माहिती समोर येत आहे. मुंबई, पुणे आणि गुजरातमधील महत्त्वाच्या शहरांत बॉम्बस्फोट घडविण्याचा कट या दहशतवाद्यांनी रचला होता. त्यासाठी पुण्यातील कोंढव्यातील बाँम्ब तयार करण्याचे प्रशिक्षण या दहशतवाद्यांनी घेतले होते. मात्र राष्ट्रीय तपास यंत्रणेने आयसिसच्या दहशतवाद्यांनी आखलेला हा कट उलटवत पुण्यातील कोंढव्यात दहशतवादी वास्तव्यास असलेली इमारत जप्त केली. (ISIS Terrorist Pune Nia Seizes Building In Pune Used For Terrorist Activities Isis Bomb Making Training)

नेमकं प्रकरण काय?

आयसिसच्या दहशतवाद्यांनी मुंबई, पुणे आणि गुजरातमधील महत्त्वाच्या शहरांत बॉम्बस्फोट घडविण्याचा कट या दहशतवाद्यांनी रचला होता. त्यासाठी पुण्यातील कोंढव्यातील बाँम्ब तयार करण्याचे प्रशिक्षण या दहशतवाद्यांनी घेतले होते. याप्रकरणी पोलिसांनी मोहम्मद आलम या आरोपीला कोथरूड परिसरात दुचाकी चोरताना पकडले होते. त्यावेळी त्याच्याबरोबर असलेल्या साथीदारांनाही पकडण्यात पोलिसांना यश आले होते. परंतू, अधिक तपासासाठी आरोपी मोहम्मदला कोंढव्यात नेण्यात आले त्यावेळी तो पसार झाला. त्यानंतर 2 नोव्हेंबर 2023 रोजी दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने त्याला पकडले आणि अधिक तपासासाठी त्याला राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या ताब्यात दिले. त्यावेळी एनआयएने आरोपी मोहम्मदची अधिक चौकशी केली असता, दहशतवाद्यांनी सातारा जिल्ह्यातील एका वस्त्रदालनात दरोडा टाकून त्यांनी बॉम्बस्फोटाचे साहित्य खरेदी केल्याचे उघड झाले.

- Advertisement -

याशिवाय, पुण्याच्या कोंढव्यात या दहशतवाद्यांनी बाँम्ब कसा तयार करायचा याबाबतचे प्रशिक्षण घेतल्याचेही तपासात उघड झाले. कोल्हापूर, सातारा परिसरातील जंगलात त्यांनी नियंत्रित पद्धतीने बाँम्बस्फोट केल्याचेही तपासात उघड झाले. तसेच, या दहशतवाद्यांनी शस्त्र चालविण्याचे प्रशिक्षणही घेतल्याची माहिती तपासात उघड झाली. दरम्यान, अधिकच्या तपासानंतर एनआयएच्या पथकाने कोंढव्यातील मीठानगर परिसरातील इमारत जप्त केली ज्यामध्ये दहशतवादी वास्तव्यास होते.

आतापर्यंत किती जणांना अटक?

एनआयएने मोहम्मद शहानाझ आलम, रिजवान अली, अब्दुलाह शेख, तलाह लियाकत खान, मोहम्मद इम्रान मोहम्मद युसुफ खान उर्फ मटका उर्फ अमीर अब्दुल हमिद खान, मोहम्मद युनुस मोहम्मद याकुब साकी उर्फ अदिल उर्फ अदिल सलीम खान, कादीर दस्तगिर पठाण उर्फ अब्दुल कादीर, समीब नासीरउद्दीन काझी, जुल्फीकार अली बडोदवाला उर्फ लालाभाई उर्फ लाला उर्फ सईफ, शमिल साकिब नाचन आणि आकिफ अतिक नाचन यांना अटक केली.

- Advertisement -

हेही वाचा – Pune Crime : इंदापूरमधील हॉटेलात तरुणाची गोळ्या झाडून हत्या, घटनेने खळबळ

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -