घरमहाराष्ट्रश्रीवर्धनमध्ये आदिती तटकरे विजयी

श्रीवर्धनमध्ये आदिती तटकरे विजयी

Subscribe

संपूर्ण रायगड जिल्ह्याचे लक्ष वेधून घेतलेल्या श्रीवर्धन मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या आदिती तटकरे यांनी शिवसेनेच्या विनोद घोसाळकर यांचा ३९ हजार ६२१ अशा मोठ्या फरकाने पराभव करून ही जागा पक्षाकडे ठेवण्यात यश मिळविले. जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसला मिळालेला हा एकमेव विजय आहे.

या मतदारसंघातील राष्ट्रवादीचे माजी आमदार अवधूत तटकरे यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर आदिती तटकरे याच येथील पक्षाच्या उमेदवार असतील हे अगोदरच स्पष्ट झाले होते. खासदार सुनील तटकरे यांनी ही जागा प्रतिष्ठेची केल्याने पक्ष कार्यकर्त्यांनी सर्व ताकद पणाला लावली होती. शिवसेनेने विनोद घोसाळकर यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांनी मतदारसंघ पिंजून काढला होता. काँग्रेसमधील बंडखोरांना शिवसेनेने बळ पुरवले होते. त्यामुळे निवडणुकीत चुरस निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र तसे झाले नाही. सुनील तटकरे, तसेच आदिती तटकरे यांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात विकास कामे आणल्याने राष्ट्रवादीचा विजय काहीसा सुकर झाला.

- Advertisement -

काँग्रेसचे ज्ञानदेव पवार यांनी मित्र पक्ष असलेल्या राष्ट्रवादीला अपशकून करण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना त्यांचे डिपॉझिटही वाचवता आलेले नाही. लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांना या मतदारसंघात ३२ हजारांपेक्षा अधिक मताधिक्य होते, ते आदिती यांनी पार केले. गेल्या निवडणुकीत अवधूत तटकरे अवघ्या 77 मतांनी विजयी झाले होते. या पार्श्वभूमीवर श्रीवर्धन मतदारसंघाने पुन्हा एकदा तटकरे कुटुंबावर विश्वास ठेवत आदिती यांना दणदणीत मताधिक्याने विधानसभेत पाठविले आहे. निकाल जाहीर होताच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष करीत विजयोत्सव साजरा केला.

असे झाले मतदान-
आदिती सुनील तटकरे (राष्ट्रवादी) ९२०७४, विनोद रामचंद्र घोसाळकर (शिवसेना) ५२४५३, सुमन यशवंत सकपाळ (बहुजन समाज पार्टी) ७७७, संजय बाळकृष्ण गायकवाड (मनसे) १४७३, अकमल अस्लम कादिरी (इंडियन युनियन मुस्लीम लीग) ३३०, रामभाऊ रामचंद्र मंचेकर (बहुजन मुक्ती पार्टी) २८१, गीता भद्रसेन वढाई (अपक्ष) ११५, दानिश नाईम लांबे (काँग्रेस बंडखोर अपक्ष) ४४३, देवचंद्र धर्मा म्हात्रे (अपक्ष) ३६६, ज्ञानदेव मारुती पवार (काँग्रेस बंडखोर अपक्ष) १८४४, भास्कर नारायण कारे (अपक्ष) ६७९, मेहेक फैसल फोपेरे (अपक्ष) ४०१, डॉ. मुईज शेख (काँग्रेस बंडखोर अपक्ष) १५७, संतोष तानाजी पवार (अपक्ष)११८३ आणि नोटा ३७७२.

- Advertisement -

विजयी उमेदवार – आदिती तटकरे (राष्ट्रवादी)
मिळालेली मते – ९२,०७४
पराभूत उमेदवार – विनोद घोसळकर (शिवसेना)
मिळालेली मते – ५२,४५३

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -