घरमहाराष्ट्रमुंबई विकण्याचा सरकारचा नवा डाव, आदित्य ठाकरेंचा खळबळजनक आरोप

मुंबई विकण्याचा सरकारचा नवा डाव, आदित्य ठाकरेंचा खळबळजनक आरोप

Subscribe

मुंबई – राज्यातील प्रकल्प गुजरात आणि अन्य राज्यात गेले असल्याची माहिती देऊन खळबळ उडवून देणाऱ्या आदित्य ठाकरेंनी आता पुन्हा एकदा शिंदे सरकारवर मोठा आरोप केला आहे. ज्या जागेवर अॅक्वेरिअम, मोकळ्या जागा आणि अर्बन फॉरेस्ट करणार होतो, तीच जागा सरकारने बिल्डरच्या घशात घालण्याचा डाव रचलाय, असा आरोप शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी केला आहे. आज त्यांनी याबाबत ट्विट करत ही माहिती दिली.

आदित्य ठाकरे ट्विटमध्ये म्हणतात की, माझ्या ऐकण्यात येतंय की, वरळी डेअरीच्या जागेवर जिथे आम्ही मुंबईकरांसाठी ॲक्वेरियम, मोकळ्या जागा आणि अर्बन फॉरेस्ट करणार होतो ते रद्द करत, खोके सरकारने समिती स्थापन  करून हा भूखंड बिल्डरच्या घश्यात घालण्याचा डाव रचलाय! आमच्यावरचा राग मुंबईवर काढला जातोय, हे मुंबई विकत आहेत!

- Advertisement -

वरळीतील मुंबई डेअरी किंवा मुंबई पोर्ट ट्रस्ट येथे जागतिक दर्जाचं मत्स्यालय महाराष्ट्रात तयार करण्यासाठी सर्व तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती नुकतीच वन, मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली होती. दुबईपेक्षाही आकर्षक आणि भव्य असे हे मत्स्यालय असेल असंही सुधीर मुनगंटीवार म्हणाले होते. ही घोषणा होताच तीनच आठवड्यात आदित्य ठाकरेंनी असा खळबळनजक आरोप केल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -