घरताज्या घडामोडीमुंबईचं लसीकरण ७ दिवसात करु परंतु लसी उपलब्ध होणं गरजेचं, आदित्य ठाकरे...

मुंबईचं लसीकरण ७ दिवसात करु परंतु लसी उपलब्ध होणं गरजेचं, आदित्य ठाकरे यांची माहिती

Subscribe

लॉकडाऊनसंदर्भात मुख्यमंत्री निर्णय घेतील - अस्लम शेख

राज्यात कोरोनाची तिसरी लाट कधी येईल आणि कशी येईल याच्यासंबंधित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे टास्क फोर्ससोबत बैठक घेत आहेत. परंतु कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर मुंबईत, कांजूर, मध्य मुंबईमध्ये कोविड सेंटर उभारण्यात येत आहेत. पिडियाट्रिक कोरोना सेंटर उभारण्यात येत असून यामध्ये लहान मुले आणि लहान मुलांसोबत असलेल्या पालकांवर उपचार करण्यात येणार आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेपासून नागरिकांना सुरक्षित करण्यासाठी मुंबईचे लसीकरण ७ दिवस करुन परंतु कोरोना लसींचे डोस उपलब्ध होणे गरजेचे असल्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. केंद्र सरकारकडून कोरोना लसीचा पुरवठा अपुरा होत असल्याची खंत आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केली आहे.

मुंबईतील कोविड सेंटरचे काम सुरु असून याचा आढावा घेण्यासाठी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी पाहणी केली. यावेळे त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. कोरोना विषाणूशी लढण्यासाठी आपण तयार राहिले पाहिजे याची तयारी सुरु आहे. कोरोना वायरस हा आता म्यूटेड होत आहे. कोरोनाचे डबल म्युटेशन होत असताना आपण तयारी वाढवली पाहिजे. कोरोनाशी लढण्यासाठी वेगाने लसीकरण करण्यात येत आहे. मुंबईतील नागरिकांचे ७ दिवसात लसीकरण पुर्ण करु शकतो परंतु लसींचा पुरवठा होणे गरजेचे आहे.

- Advertisement -

मुंबईनंतर आता पुणे, कोल्हापुरने लसीकरणामध्ये गती घेतली आहे. यामुळे कोरोना लसीकरणासंदर्भात सगळे तयारी झाली आहे. परंतु कोरोना लसींच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे सगळे अडथळे येत आहेत. कोरोना रोखण्यासाठी सर्वोतपरी प्रयत्न सुरु आहेत. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेशी सामना करण्यासाठी पुर्वतयारी सुरु आहे. सर्वांना कोरोना लसीकरण झाले तर प्रत्येकजण सुरक्षित असू असे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.

लॉकडाऊनसंदर्भात मुख्यमंत्री निर्णय घेतील – अस्लम शेख

राज्यातील लॉकडाऊनमधील शिथिलतेबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निर्णय घेतली. राज्यात कोरोना परिस्थिती आटोक्यात आली आहे. परंतु तात्काळ रेल, ट्रेन,गाड्यांना परवानगी देता येणार नाही. कोरोना संदर्भात विचार करणे गरजेचे आहे. लॉकडाऊन असूनही रस्त्यावर गाड्या धावत आहेत. अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना परवानगी देण्यात आली आहे. दुसऱ्या राज्याच्या तुलनेत महाराष्ट्रातील स्थिती उत्तम आहे. नागरिकांचा जीव वाचवणे हे प्रथम कर्तव्य आमचे आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी तयारी करण्याच काम सुरु आहे. त्यानंतर टास्क फोर्ससोबत निर्णय घेऊन लॉकडाऊन कायम राहणार का खोलणार यावर निर्णय घेतला जाईल असे मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी म्हटले आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -