घरमहाराष्ट्रखरंच त्यांची मला कीव येतेय; पोस्टरबाजीवर आदित्य ठाकरेंचा पलटवार

खरंच त्यांची मला कीव येतेय; पोस्टरबाजीवर आदित्य ठाकरेंचा पलटवार

Subscribe

आज विधान परिषदेच्या बाहेर माध्यमांशी बोलताना आमदार आदित्य ठाकरे यांनी अनेक मुद्दांवर सरकार विरोधात आपल्या प्रतिक्रिया मांडल्या आहेत.

राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. यात अधिवेशनाचा पाचवा दिवस विधानभवन परिसरात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये झालेल्या वादविवादामुळे चांगलाच गाजला. यात आज शेवटच्या दिवशी सरकारमधील शिंदे गटाने थेट आदित्य ठाकरेंना टार्गेट केले आहे. आज सत्ताधारी शिंदे गटातील आमदारांनी प. पू. युवराज म्हणत आदित्य ठाकरेंना डिवचले. विधानभवनाच्या पायऱ्यांवरून शिंदे गटातील आमदारांनी आदित्य ठाकरेंविरोधात बॅनरबाजी करत निशाणा साधला. दरम्यान, यासंदर्भात आता आमदार आदित्य ठाकरे यांनी पलटवार केलाय.

आज विधान भवन परिसरात माध्यमांशी बोलताना आमदार आदित्य ठाकरे यांनी अनेक मुद्द्यांवर सरकारविरोधात आक्रमक भूमिका मांडली. विशेष म्हणजे आजच्या पोस्टरबाजीवर विचारले असता ते म्हणाले की, “आज ते पायऱ्यांवर स्वत:च्या अंगाला पोस्टर चिकटवून उभे आहेत, त्यांची खरंच मला कीव येते. हे कृत्य करून ते त्यांच्या कुटुंबातील संस्कार दाखवत आहेत. पायऱ्यांवर उभे असणाऱ्यांपैकी अनेकांना मंत्रिपद मिळालेलं नाही, त्यांना पायऱ्यांवर त्यांच्या मनात नसताना देखील तिथे उभं राहावं लागत आहे. त्यांच्या चेहऱ्यावर आज मला नैराश्य दिसत आहे. शिवसेनेशी गद्दारी केल्यामुळे जनता देखील त्यांच्या विरोधात बोलत आहे. जर आज ते या पायऱ्यांवर शेतकऱ्यांचे विषय, महिलांचे विषय, तरुण मुलांच्या नोकरीचे विषय यांसारखे अनेक विषय घेऊन उभे असते, तर आज मला खरंच त्यांचा गर्व वाटला असता,” असा टोलाही आदित्य ठाकरेंनी लगावलाय.

- Advertisement -

आमचे दौरे हे सुरूच राहतील. आम्हाला कितीही दाबण्याचा प्रयत्न केला, तरी आम्ही आमचं काम करत राहू आणि गद्दारी करणाऱ्यांचा मुखवटा एकदिवस जगासमोर आणू. आम्ही गद्दारीचा मुखवटा फाडू, त्या 40 लोकांनी राजीनामे देऊन निवडणुकीला सामोरं जावं, जनतेच्या मनात जे काही असेल ते कळेल, असंही त्यांनी सांगितलंय.

कोणाच्या पाठीत खंजीर खुपसन हे आमचे हिंदुत्व नाही. सगळ्यांना एकत्र घेऊन चालने हे आमचे हिंदुत्ववादी धोरण आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवणे, शिक्षणाचे प्रश्न सोडवणे तसेच राज्याच्या कल्याणाचा विचार करणे हे आमचे हिंदुत्व आहे. आता जे सुरू आहे ते रावण राज्य आहे. राम राज्य नाही, असं म्हणत त्यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधलाय.

- Advertisement -

“50 खोक्यांचा आरोप आम्ही करत नाही, हे जगजाहीर आहे. त्यांची गद्दारी सगळ्या महाराष्ट्राला ठाऊक आहे.” दरम्यान, आज विधिमंडळाच्या पायऱ्यांवर शिंदे गट व भाजप आमदारांची आदित्य ठाकरेंविरोधात ’50 खोके, मातोश्री ओके’, ‘युवराज दिशा भरकटले’, अशी घोषणाबाजी सत्ताधारी करत होते, असं म्हणत त्यांनी पलटवार केलाय.


हेही वाचा :शिंदे गटाचा आदित्य ठाकरेंवर निशाणा ,प. पू. युवराज म्हणत डिवचले

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -