घरमहाराष्ट्रपुणेमनसेच्या सभासद नोंदणीला पुण्यातून सुरुवात, राज ठाकरे ठरले पहिले सदस्य

मनसेच्या सभासद नोंदणीला पुण्यातून सुरुवात, राज ठाकरे ठरले पहिले सदस्य

Subscribe

पुणे – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) शस्त्रक्रियेनंतर आता पुन्हा सक्रीय झाले आहेत. ते पुणे दौऱ्यावर गेले असून आज पुण्यातील मध्यवर्ती कार्यालयातून मनसेच्या सदस्य नोंदणीला (MNS Member Registration) सुरुवात झाली. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पहिला सदस्य म्हणून राज ठाकरे यांच्या नावाची नोंदणी करण्यात आली. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी याबाबत माहिती दिली. तसेच, माझी नोंदणी केल्याबद्दल मी मनसेचे आभार मानतो असंही मिश्किलीत राज ठाकरे म्हणाले. (MNS Member Registration started from Pune first member register Raj Thackeray)

सदस्य नोंदणीला सुरुवात झाल्यानंतर राज ठाकरे म्हणाले की, आजपासून सभासद नोंदणीला सुरुवात झाली. आजपर्यंत मुंबईत सभासद नोंदणी व्हायची. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार प्रत्येक पक्षाने ३-४ वर्षांनी नव्याने सदस्य नोंदणी करायची असते. त्यानुसार, आमची अगोदरची नोंदणी लॉकडाऊआधी झाली होती. त्यामुळे आता नव्याने सदस्य नोंदणी सुरू झाली.

- Advertisement -

सदस्य नोंदणीनंतर काय होणार?

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सभासद नोंदणीला आजपासून सुरुवात झाली आहे. नोंदणीनंतर प्रत्येक सभासदाला मोबाईलवर पक्षाविषयी माहिती येईल. तसेच, राज ठाकरे यांची भाषणं, वक्तव्य पाठवण्यात येणार आहे.

- Advertisement -

मी हिंदवी रक्षक, मी महाराष्ट्र सेवक

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आता कंबर कसण्यास सुरुवात केली आहे. नेहमी मराठी आणि हिंदुत्वाच्या मुद्दावर आक्रमकपणे लढणारी राज ठाकरेंची मनसे आता मी हिंदवी रक्षक, मी महाराष्ट्र सेवक हे नवं घोषवाक्य देणार आहे. यापूर्वी मनसेने पक्ष स्थापनेवेळी राज ठाकरेंनी ‘मी महाराष्ट्राचा, महाराष्ट्र माझा’ हे घोषवाक्य जाहीर केलं होतं.

हेही वाचा – ‘मी हिंदवी रक्षक, मी महाराष्ट्र सेवक’, मनसेचं नवं घोषवाक्य

राज ठाकरे सक्रीय

राज ठाकरे यांनी २२ आणि २३ ऑगस्ट रोजी पदाधिकाऱ्यांची बैठक आणि कार्यकर्त्यांसाठी  मेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्यात राज ठाकरे यांनी राजकीय सद्यस्थितीवर भाष्य केलं. त्यांनी सत्ताधाऱ्यांवर आसूड ओढले. तसेच, उद्धव ठाकरेंवरही तोफ डागली होती. नुपूर शर्मा प्रकरणी त्यांनी असुद्दूदीन ओवेसींवरही टीका केली. तर, पदाधिकाऱ्यांनाही पक्षाबाबत आवाहन केलं.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -