घर महाराष्ट्र Aaditya Thackeray : लोकसभा निवडणुकांबाबत आदित्य ठाकरेंचे भाकीत, म्हणाले ...

Aaditya Thackeray : लोकसभा निवडणुकांबाबत आदित्य ठाकरेंचे भाकीत, म्हणाले …

Subscribe

हे सरकार इतक्या छोट्या निवडणुका घ्यायला पण घाबरत असेल तर यांच्यामध्ये काय दम आहे, हे दिसून येत आहे, असा टोला ठाकरे गटाचे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी लगावला आहे. सिनेट निवडणुकांना स्थगिती देण्यात आल्यानंतर याबाबत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकांवर स्थगिती आणण्यात आली आहे. याबाबतचे परिपत्रक काल (ता. 17 ऑगस्ट) प्रसिद्ध करण्यात आले. त्यानंतर या प्रकरणावरून आता अनेक विद्यार्थी संघटनांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. विरोधकांनी सुद्धा सरकारच्या या निर्णयाचा विरोध करत संताप व्यक्त केला आहे. हे सरकार इतक्या छोट्या निवडणुका घ्यायला पण घाबरत असेल तर यांच्यामध्ये काय दम आहे, हे दिसून येत आहे, असा टोला ठाकरे गटाचे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी लगावला आहे. आज (ता. 18 ऑगस्ट) घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना आदित्य ठाकरे यांनी लोकसभेच्या निवडणुकांबाबत देखील भाकीत केले आहे. (Aditya Thackeray’s prediction regarding Lok Sabha elections)

हेही वाचा – Senate Election : …तर तुमच्यात काय दम? सिनेट निवडणुका स्थगित झाल्याने आदित्य ठाकरे संतापले

- Advertisement -

पत्रकार परिषदेमध्ये बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, कुठे गडबड गोंधळ झालाय? मणिपूरमध्ये जी परिस्थिती आहे, तसे वातावरण इथे नाही. आम्ही कुठलीही मारामारी, वादविवाद न करता निवडणूक लढवत होतो. मग निवडणूक रद्द का केली? सव्वा लाख मतदारांनी नोंदणी केली होती. हे सर्व पदवीधर होते. मग असे काय झाले, निवडणूक का स्थगित केली? पत्रकात म्हटले आहे की, बैठकीत ठरल्यानुसार निवडणूक स्थगित केली. ही बैठक किती वाजता, कुठे झाली? बैठकीचे मेरीट्स काय आहेत? सर्व अधिकाऱ्यांचे फोन बंद आहेत. स्थगित केलेली निवडणूक पुन्हा कधी होणार? सव्वालाख वोटर्सची 20 रुपये देऊन नोंदणी केली होती. प्रत्येक मतदाराची छाननी केली गेली. जे खोटे मतदार होते. ते कमी करुन 95 हजारावर मतदार यादी आली, अशी माहिती आदित्य ठाकरे यांनी दिली.

मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीवर या डरपोक मुख्यमंत्र्यांचा दबाव होता का, ते घाबरत आहेत. पुणे लोकसभेची पोटनिवडणूक अद्याप होऊ शकलेली नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अद्याप होऊ शकत नाही. यानंतर किमान मुंबई विद्यापीठाच्या निवडणुका तरी होतील असे आम्हाला वाटले. मात्र, या निवडणुकीला सामोरे जायलाही ते घाबरत असतील, तर आपण समजायचे तरी काय? उद्या लोकसभा निवडणुका जाहीर करून त्या निवडणुकांचा कार्यक्रम पण या सरकारकडून रद्द करण्यात येईल आणि मग हे सांगतील की, आम्ही आमची नेमणूक करून सरकार चालवू, अशी जळजळीत टीका त्यांनी केली आहे.

- Advertisement -

- Advertisment -