घरदेश-विदेश2024च्या लोकसभा निवडणुकांत NDAला फटका? सर्वेक्षणाचे निष्कर्ष सांगतात...

2024च्या लोकसभा निवडणुकांत NDAला फटका? सर्वेक्षणाचे निष्कर्ष सांगतात…

Subscribe

टाइम्स नाऊ नवभारतच्या सर्वेक्षणानुसार, NDAला 2019 च्या तुलनेत यावेळी मतांच्या टक्केवारीत खूप नुकसान सहन करावं लागू शकतं. मात्र, असं असंल तरीही देशात 2024 लोकसभा निवडणुकांनंतर तिसऱ्यांदा एनडीएचंच सरकार स्थापन होईल, असा निष्कर्षही सर्वेक्षणातून व्यक्त करण्यात आला आहे.

देशात 2024 मध्ये लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. पण आतापासूनच सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. जागावाटप असो किंवा मग मतदारांना आकर्षित करणं असो, सत्ताधारी आणि विरोधक सर्व बाजूंनी सातत्याने बैठका घेतल्या जात आहेत आणि विजयाचे दावेही करत आहेत. याच दरम्यान, टाईम्स नाऊ ईटीजीनंही सर्वेक्षण करुन अंदाज बांधले आहेत. टाइम्स नाऊ नवभारतने केलेल्या सर्वेक्षणात मात्र सत्ताधारी NDA सरकारसाठी धोक्याची सूचना देण्यात आली आहे. (NDAs big loss in 2024 Lok Sabha elections A threat to the ruling party in the survey India Navbharat Survey)

टाइम्स नाऊ नवभारतच्या सर्वेक्षणानुसार, NDAला 2019 च्या तुलनेत यावेळी मतांच्या टक्केवारीत खूप नुकसान सहन करावं लागू शकतं. मात्र, असं असंल तरीही देशात 2024 लोकसभा निवडणुकांनंतर तिसऱ्यांदा एनडीएचंच सरकार स्थापन होईल, असा निष्कर्षही सर्वेक्षणातून व्यक्त करण्यात आला आहे.

- Advertisement -

सर्वेक्षणानुसार, किती टक्के मतं?

ईटीजी रिसर्चसोबत टाईम्स नाऊनं केलेल्या सर्वेक्षणात एनडीएला 42.60 टक्के मतं, तर विरोधकांच्या I.N.D.I.A ला 40.20 टक्के मतं मिळण्याची शक्यता आहे.

मागच्या लोकसभा निवडणुकीत NDA ला 45 टक्के मतं मिळाली होती. मात्र, आागमी लोकसभा निवडणुकांमध्ये मात्र एनडीएच्या मतांची टक्केवारी कमी होणार असल्याचं सर्वेक्षणातून सांगण्यात आलं आहे. असं असलं तरीही पुन्हा एकदा मात्र मोदी सरकारचं सत्तेत येणार आहे, असंही या सर्वेक्षणातून समोर आलं आहे.

- Advertisement -

NDA आणि INDIA महाराष्ट्रात जागा किती?

महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीपूर्वी टाइम्स नाऊ-ईजीटीचा ओपिनियन पोल समोर आला आहे. ज्यामध्ये लोकसभा निवडणूक 2024 संदर्भात सर्वेक्षण करण्यात आले आहे की, आज लोकसभा निवडणूक झाल्यास महाराष्ट्रात किती जागा कोणाला मिळू शकतात. सर्वेक्षणाचे निष्कर्ष आश्चर्यकारक आहेत. टाईम्स नाऊ नवभारतच्या सर्वेक्षणानुसार NDA ला 28 ते 32 जागा आणि India Alliance ला 15 ते 19 जागा आणि इतरांना 1 ते 2 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

( हेही वाचा: “लोकांमधला राग मतपेटीत उतरला पाहिजे”, खड्ड्यांच्या मुद्यांवर राज ठाकरेंची आक्रमक भूमिका )

2024 ची निवडणूक रंजक होणार

महाराष्ट्रातील लोकसभा निवडणूक 2024 ही रंजक असणार आहे. कारण आधी उद्धव ठाकरेंची शिवसेना फुटली आणि एकनाथ शिंदे पक्षापासून फारकत घेऊन भाजपमध्ये दाखल झाले, तर दुसरीकडे राष्ट्रवादीतही मोठी फूट पडली. अजित पवारांनी राष्ट्रवादीत बंडखोरी करून अनेक आमदारांसह एनडीएमध्ये प्रवेश केला. अशा स्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडले. एक शरद पवारांचा आणि दुसरा अजित पवारांचा. अशा स्थितीत राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यातील फुटीचा भाजपला फायदा होतो की दोन्ही गटांना नुकसान सहन करावे लागते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -