घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रअंबडला दातीर परिवारातील तरुणाचा भरदिवसा खून; आरोपी सराईत गुन्हेगार

अंबडला दातीर परिवारातील तरुणाचा भरदिवसा खून; आरोपी सराईत गुन्हेगार

Subscribe

नाशिक : दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या रागातून तिघांनी २१ वर्षीय तरुणाचा धारदार शस्त्राने वार करत निर्घृण खून केला. सातत्याने घडणार्‍या खूनाच्या घटनांमुळे शहर मात्र हादरले आहे. ही घटना गुरुवारी (दि.१७) दुपारी अडीच वाजेच्या सुमारास अंबड परिसरातील महालक्ष्मी नगर येथील हनुमान मंदिराजवळ घडली. हल्लेखोरांच्या अटकेसाठी अंबड ग्रामस्थांनी अंबड पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला होता.

मयूर दातीर (वय २१) असे मृत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी अंबड पोलिसांनी संशयित आरोपी करण अण्णा कडुस्कर यासह त्याच्या दोन साथीदारांविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल केला आहे. नाशिक शहरातील गेल्या दोन दिवसांत खूनाची ही दुसरी घटना आहे. त्यामुळे वाढत्या गुन्हेगारीवर पोलिसांचा अंकुश राहिला नसल्याचे चित्र आहे.

- Advertisement -

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयूर दातीर हा गुरुवारी दुपारी जेवणासाठी दुचाकीवरून घराकडे जात होता. त्यावेळी तिघे संशयित त्याच्या दिशेने आले. तिघांनी त्याच्याकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले. मात्र, मयूरने त्याला नकार दिला. याचा राग अनावर झाल्याने तिघा हल्लेखोरांनी मयूरवर वार केले. त्यात मयूर गंभीर जखमी झाला. त्याला उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकार्‍यांनी तपासणी करत त्यास मृत घोषित केले. हल्ल्याच्या घटनेनंतर हल्लेखोर फरार झाले. संशयितांमध्ये एका सराईत गुन्हेगाराचा समावेश आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त मोनिका राऊत, अंबडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्यासह अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते. पोलिसांकडून आरोपींच्या शोधासाठी तातडीने पथके रवाना करण्यात आली आहेत. दरम्यान, गुरुवारी सायंकाळी अंबडच्या मारुती मंदिरात ग्रामसभा झाली. आरोपींच्या अटकेशिवाय मृतदेह ताब्यात न घेण्याची भूमिका नागरिकांनी घेतली होती.

रेकॉर्डवरील करणवर १८ गुन्हे; चौकशीत समोर आली माहिती

  • अंबड पोलीस स्टेशनहद्दीत मयूर दातीर या युवकाची आर्थिक वादातून हत्या
  • हल्लेखोरांमध्ये रेकॉर्डवरील गुन्हेगार करण कडूस्कर, रवी आहेर, मुकेश मगर अशी संशयित हल्लेखोरांची नावे
  • दारू पिण्यासाठी पैसे मागितल्याने झाला मयूरचा खून
  • मुकेश मगर हा तडीपार आरोपी
  • तिघे हल्लेखोर अंबड गावातील रहिवाशी
  • मोक्का, तडीपारीची कारवाई सुरू
  • कडूस्करवर खून, घरफोड्या, लूटमार असे 18 गुन्हे दाखल
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -