घरताज्या घडामोडीअखेर रायगडावरील हेलिपॅड रद्द, शिवप्रेमींच्या तीव्र विरोधाचा परिणाम

अखेर रायगडावरील हेलिपॅड रद्द, शिवप्रेमींच्या तीव्र विरोधाचा परिणाम

Subscribe

रायगडावरील होळीच्या माळावर राष्ट्रपतींचे हेलिकॉप्टर उतरवण्याला वाढत्या विरोधाची दखल घेत होळीच्या माळावर हेलिपॅड रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राष्ट्रपतींना आता गडावर रोपवेने पोहोचवले जाणार आहे. माळावर हेलिपॅड उभारून तिथे हेलिकॉप्टर उतरवण्यात आल्यास त्याचा परिणाम छत्रपतींच्या पुतळ्यावर धुळीचे साम्राज्य निर्माण होत असल्याचा आक्षेप घेत शिवप्रमींनी तीव्र विरोध नोंदवला होता. याची दखल घेत राष्ट्रपतींच्या नियोजित दौर्‍यातून हेलिकॉप्टरचा प्रवास रद्द करण्यात येऊन आता त्यांना रोपवेने गडावर नेण्यात येणार आहे. यासंबंधीचे ट्विट छत्रपती संभाजी राजे यांनी केले आहे.

रायगडावर भेट देणार्‍या राष्ट्रपतींचे हॅलिकॉप्टर रायगडावर उतरण्यासाठी होळीच्या माळावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या समोरच प्रशासनाकडून हेलिपॅड तयार केला जात होता. हॅलिपॅडमुळे छत्रपती शिवरायांचा पुतळा धुळीत माखतो आणि त्याचे सौंदर्य लोप पावत असल्याचा आक्षेप घेत या हॅलिपॅडच्या उभारणीस सर्वच स्तरातून विरोध होऊ लागला होता. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी रायगड किल्ल्यावर आल्या तेव्हाही होळीच्या माळावर हेलिपॅड उभारण्यात आले होते. तेव्हाही हेलिपॅड उभारण्यास जोरदार विरोध झाला होता. हेलिकॉप्टर येत असताना उडणारी धूळ शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर उडत असल्याने जेव्हा केव्हा माळावर हेलिपॅड उभारला जातो तेव्हा त्याला शिवभक्तांनी विरोध दर्शवल्याचा इतिहास आहे. अटल बिहारी वाजपेयी रायगडावर आले तेव्हा हेलिपॅडची जागा बदलण्यात आली आणि त्यांना कार्यक्रम स्थळी नेण्यासाठी अ‍ॅम्बॅसाडर ही कार गडावर नेण्यात आली होती.

- Advertisement -

मात्र, यानंतर रायगडावर हेलिपॅड बनवण्यातही आले नाही. ६ डिसेंबरच्या सोमवारी देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे रायगडावर येत असल्याने त्यांना उतरवण्यासाठी होळीच्या माळावरच शिवाजी महाराजांच्या पुतळ्याशेजारी हेलिपॅड तयार करण्यात येत होते. प्रशासनाच्या या कृतीला शिवभक्तांनी जोरदार विरोध दर्शवला होता. राष्ट्रपतींचे हेलिकॉप्टर माळावर उतरवण्याचा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी करण्यात आली होती. आता राष्ट्रपतींच्या सुधारित कार्यक्रमात त्यांना गडावर रोपवेनेच जावे लागणार आहे. छत्रपती संभाजी राजे यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे.

- Advertisement -

हेही वाचा :  Omicron variant: कल्याण डोंबिवलीत एकाला ओमिक्रॉनची लागण, राज्यात पहिल्या रुग्णाची नोंद


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -