घरताज्या घडामोडी'अग्निपथ' योजनेमुळे मूळ लष्कर भरती प्रक्रिया बंद होणार नाही - चंद्रकांत पाटील

‘अग्निपथ’ योजनेमुळे मूळ लष्कर भरती प्रक्रिया बंद होणार नाही – चंद्रकांत पाटील

Subscribe

अग्निपथ योजना आल्यानंतरही मूळ लष्कर भरती प्रक्रिया बंद होणार नसल्याची मोठी माहितीही त्यांनी दिली. त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी अग्निपथ योजनेविषयी पसरेल्या अफवेवर वाचा फोडली.

अग्निपथ योजना जाहीर झाल्यापासून देशभर हिंसक आंदोलन होत आहेत. यामुळे जनमाणसांत अग्निपथ योजनेविषयी अपप्रचार केला जात असल्याचा आरोप भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. तसंच, अग्निपथ योजना आल्यानंतरही मूळ लष्कर भरती प्रक्रिया बंद होणार नसल्याची मोठी माहितीही त्यांनी दिली. त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी अग्निपथ योजनेविषयी पसरलेल्या अफवेवर वाचा फोडली. (‘Agneepath’ scheme will not stop the old recruitment process – Chandrakant Patil)

हेही वाचा – अग्निपथ योजनेत मोठा बदल, सीआरपीएफ आणि आसाम रायफल्ससाठी महत्त्वाचा निर्णय

- Advertisement -

अग्निपथ ही योजना अधिकची योजना आहे. या योजनमुळे मूळ लष्कर भरती प्रक्रिया बंद होणार नाहीय, असं चंद्रकांत पाटील म्हणाले. हिंसाचार करत असलेले तरुण सैन्यामध्ये जाण्याच्या मनस्थितीचे नाही. सैन्यात जाणारा तरुण देशाची प्रॉपर्टी का जाळेल? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

हेही वाचा अग्निपथ योजनेच्या विरोधात आज विद्यार्थी संघटनांकडून बिहार बंदची हाक

- Advertisement -

अग्निपथ विरोधात केलेलं आंदोलन हे निर्माण केलेलं आंदोलन आहे. तरुणांची माथी भडकावून त्यांना आंदोलन करण्यास प्रवृत्त करण्यात आलं आहे. केंद्र सरकारच्या या घोषणेमुळे विरोधी पक्षांची झोप उडाली आहे, असंही पाटील म्हणाले.

विरोधी पक्षावर टीका करताना ते पुढे म्हणाले की, केंद्र सरकारने वर्षाला १० लाख रोजगार उपलब्ध करणार असल्याची घोषणा केल्याने काँग्रेसची झोप उडाली आहे. या योजनेमुळे तरुण वर्गही भाजपकडे जाईल अशी भिती काँग्रेसला वाटत आहे.

हेही वाचा – ‘अग्निपथ’च्या नावाखाली देशाला पुन्हा बेरोजगारीत ढकलण्याचा डाव, नाना पटोलेंचा घणाघात

आंदोलन करणाऱ्या तरुणांनाही चंद्रकांत पाटलांनी आवाहन केलं आहे. अशाप्रकारचे आंदोलन करून स्वतःवर गुन्हे दाखल करून घेऊ नका. यामुळे तुम्हाला कुठेच नोकरी मिळणार नाही. अग्निपथ योजना नक्की काय आहे हे समजून घ्या. ती योजना मान्य नसेल तर सरकारसोबत शांततेत चर्चा करा. आंदोलनामुळे तुम्ही तुमच्या पायावर कुऱ्हाड मारुन घेत आहात, असंही पाटील म्हणाले.

दरम्यान, विधान परिषदेच्या निवडणुकीत हरल्यानंतर कोणती कारणं द्यायची हे आत्ताच ठरवून घ्या, असा टोलाही त्यांनी लगावला. महाविकास आघाडीतील बेबनाव थांबवण्याची ताकद त्यांच्यातच आहे. पण त्यांच्या बेबनावचा फायदा भाजपला होऊन भाजपचे पाचही उमेदवार जिंकून येतील असा आम्हाला विश्वास आहे, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -