घरताज्या घडामोडीविधान परिषद निवडणुकीत केंद्रीय यंत्रणांचा दुरूपयोग; नाना पटोलेंचा गंभीर आरोप

विधान परिषद निवडणुकीत केंद्रीय यंत्रणांचा दुरूपयोग; नाना पटोलेंचा गंभीर आरोप

Subscribe

विधान परिषद निवडणुकीत केंद्रीय तपास यंत्रणां हस्तक्षेप करत असल्याचा गंभीर आरोप कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

विधान परिषद निवडणुकीत (Legislative Council elections) केंद्रीय तपास यंत्रणा हस्तक्षेप करत असल्याचा गंभीर आरोप कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केला आहे. महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) आमदारांवर दबाब टाकण्यासाठी फोन केले जात असल्याचाही आरोप नाना पटोले यांनी केला. (Misuse of central securities in Legislative Council elections Serious allegations of Nana Patole)

केद्राच्या तपास यंत्रणांच्या दुरूपयोगाबाबत नाना पटोले यांनी प्रसार माध्यमांशी बातचीत करताना माहिती दिली. यावेळी त्यांनी केंद्रावर आरोप करत, योग्य वेळ येईल तेव्हा याचा खुलासा करीन तसेच, जनतेसमोर भुमिका मांडू असेही त्यांनी म्हटले. “आमच्याकडे जो रेकॉर्ड आला आहे, त्या रेकॉर्डच्या माहितीनुसार, ईडी आणि सीबीआयचा याचा दुरूपयोग कसा चालतोय हे आम्हाला निवडणुकीच्या माध्यमातून समजलेले आहे. तसेच, कसे कोणाला टार्गेट केले जाते, तुम्ही आम्हाला वोट द्या नाही तर आम्ही तुमच्यावर कारवाई करू, या पद्धतीच्या भावना अनेक ठिकाणी आलेल्या आहेत. त्यामुळे ही परिस्थिती लोकशाहीला घातक आहे. भाजपा ईडी आणि सीबीआयचा हत्यार म्हणून वापर करते आहे. तसेच त्यांनी याबाबत सामंजस्यपणा न दाखवल्यास आम्ही याचा खुलासा जनतेसमोर करू.”, असेही त्यांनी म्हटले.

- Advertisement -

हेही वाचा – मुख्यमंत्री कार चालवतात आणि सरकार भगवान चालवतंय : देवेंद्र फडणवीस

येत्या सोमवार २० जून रोजी विधान परिषदेच्या १० जागांसाठी मतदान होणार आहे. या मतदानापूर्वीच आता राज्यातील महाविकास आघाडी सरकार आणि केंद्र सरकार यांच्यात वाद सुरू झाला आहे.

- Advertisement -

विधानपरिषद निवडणुकीकरिता महाविकास आघाडीची रणनिती तयार आहे. शिवसेना नेते खासदार संजय संजय राऊत यांच्या वक्तव्यानंतर अपक्ष येऊन भेटले त्यामुळे अपक्षांचा विषय आता संपला आहे. आमच्या उमेदवारांकडे गरजेपेक्षा जास्त मतं आहेत. त्यामुळे दबाव टाकला जात आहे, असा नाना पटोले यांनी केला आहे. तसेच, या फोनचे रेकॉर्डींगही आमच्याकडे आहे, असे त्यांनी म्हटले.

“विधानपरिषद निवडणुकीकरिता विरोधकांना २२ मतं हवी आहेत. पण एवढी मतं त्यांना मिळणार नाहीत. त्यामुळे केंद्रीय तपास यंत्रणांचा दुरुपयोग, पैशांचा वापर यांचा उपयोग आता भाजपला होणार नाही”, असा टोला पटोले यांनी लगावला.


हेही वाचा –  मलिक, देशमुखांना मतदानाची परवानगी नाकारणे हा भाजपासाठी शुभसंकेत : आशीष शेलार

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -