घरताज्या घडामोडीअग्निपथ योजनेच्या विरोधात आज विद्यार्थी संघटनांकडून बिहार बंदची हाक

अग्निपथ योजनेच्या विरोधात आज विद्यार्थी संघटनांकडून बिहार बंदची हाक

Subscribe

केंद्र सरकारने (Central Government) लष्कर भरतीसाठी नवीन अग्निपथ योजनेची (Agneepath Scheme) घोषणा केली. या घोषणेनंतर मागील काही दिवसांपासून सतत देशाच्या अनेक भागांत जाळपोळ आणि हिसांचाराच्या घटना घडत आहेत.

केंद्र सरकारने (Central Government) लष्कर भरतीसाठी नवीन अग्निपथ योजनेची (Agneepath Scheme) घोषणा केली. या घोषणेनंतर मागील काही दिवसांपासून सतत देशाच्या अनेक भागांत जाळपोळ आणि हिसांचाराच्या घटना घडत आहेत. केद्राच्या या योजनेला देशभरातून विरोध केला जात आहे. अशातच आता देशभरातील विद्यार्थी आणि विद्यार्थी संघटना बिहार बंदची (Bihar Closed) हाक दिली आहे. नवीन अग्निपथ योजनेच्या घोषणेमुळे बिहारमध्ये वातावरण चिघळले आहे. बिहारमध्ये या योजनेच्या विरोधात असणाऱ्या आंदोलकांनी आक्रमक भुमिका घेतली आहे. (agneepath scheme protest bihar bandh)

लष्कर भरतीसाठी नवीन अग्निपथ योजनेच्या विरोधात देशभरातील विद्यार्थी आणि विद्यार्थी संघटना रस्त्यावर उतरले आहेत. तसेच, या विद्यार्थ्यांकडून जोरदार निषेध व्यक्त केला जात आहे. यामध्ये आता काही विद्यार्थी संघटनांनी आज बिहार बंदची हाक दिली आहे. या बंदला डाव्यांनी पाठिंबा दर्शवला आहे. लालू प्रसाद यादव यांचा पक्ष आरजेडीने या बंदला समर्थन दिले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – अग्निपथ योजनेविरोधात बिहारमध्ये आंदोलन चिघळले, पाचहून अधिक ट्रेन पेटवल्या, तिकीट काउंटरही जाळले

मिळालेल्या माहितीनुसार, बिहार बंदच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून तसेच, अफवा रोखण्यासाठी बिहारमधील बहुतांश जिल्ह्यांमध्ये मोबाईल इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. त्यानुसार, बिहारमधील १२ जिल्ह्यांमध्ये १९ जूनपर्यंत इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात येणार आहे. दरम्यान, देशभरातून अग्निपथ योजनेला विरोध होत असून, याचा सर्वाधिक फटका भारतीय रेल्वेला बसला आहे. आतापर्यंत ३४० गाड्यांवर परिणाम झाल्याने रेल्वेचे ४० कोटींहून अधिक नुकसान झाले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – ‘अग्निपथ’च्या नावाखाली देशाला पुन्हा बेरोजगारीत ढकलण्याचा डाव, नाना पटोलेंचा घणाघात

अग्निपथ योजनेविरोधात निदर्शनाचा आज चौथा दिवस आहे. उत्तर प्रदेश, झारखंड, मध्य प्रदेश, राजस्थान आणि हरियाणासह अनेक राज्यांमध्ये निदर्शनं सुरू आहेत. बिहारमध्ये २२ जिल्ह्यांमध्ये अग्निपथ योजने विरोधात निदर्शनं सुरु आहेत.


हेही वाचा – मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात घुसली अज्ञात कार; थोडक्यात अपघात वाचला

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -