घरमहाराष्ट्रअजित पवारांचं विखे पाटलांना खुलं आव्हान!

अजित पवारांचं विखे पाटलांना खुलं आव्हान!

Subscribe

'काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमधले काहीजण माझ्या संपर्कात असून त्यांना युतीमध्ये यायचंय', या राधाकृष्ण विखे पाटलांच्या वक्तव्यावर अजित पवारांनी त्यांना थेट आव्हानच दिलं आहे.

गेल्या काही दिवसांपासून देशभरात काँग्रेसची नेतेमंडळी, आमदार भाजपमध्ये प्रवेश करत असल्याचं पाहायला मिळत आहे. कर्नाटकमधल्या १४ आमदारांनी राजीनामे देऊन भाजप प्रवेशाची तयारी चालवली आहे. गोव्यात १० आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला. आता पश्चिम बंगालमध्ये देखील तब्बल १०७ विरोधी आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचं वक्तव्य भाजपचे मुकुल रॉय यांनी केलं आहे. महाराष्ट्रात माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनीच थेट भाजपचा रस्ता धरल्यानंतर त्यांच्या पाठोपाठ इतरही काही काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते भाजपवासी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तशी शक्तताच राधाकृष्ण विखे पाटील यांनी वर्तवली होती. मात्र, त्यांच्या या शक्यतेलाच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खुलं आव्हान दिलं आहे.

काय म्हणाले अजित पवार?

‘आगामी विधानसभा निवडणुकांसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे काहीजण माझ्या संपर्कात आहेत. त्यातल्या काहींना युतीत प्रवेश करायचा आहे. पण याबद्दलचा अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठीच घेतील’, असं वक्तव्य शुक्रवारी गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सोलापुरात केलं होतं. त्यावर प्रतिक्रिया देताना अजित पवार यांनी त्यांना खुलं आव्हान दिलं आहे. ‘भाजपच्या वाटेवर कशाला? जे आमदार जाणार आहेत, त्यांची नावंच विखे पाटलांनी जाहीर करावीत. उद्या कुणीही काहीही म्हणेल. जे जायचे असतील, ते जातील’, असं अजित पवार म्हणाले आहेत. पिंपरी-चिंचवडमध्ये एका खासगी हॉटेलच्या उदघाटन प्रसंगी ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

- Advertisement -

पाहा कोण म्हणतंय! – ‘राष्ट्रवादीचे १० आमदार आपल्या संपर्कात’

गोव्यात काँग्रेसकडे उरले फक्त ५!

कर्नाटकमधल्या राजकीय नाट्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारपर्यंत अर्थात १६ जुलैपर्यंत पुढे ढकलला असला, तरी गोव्यात मात्र विरोधी पक्षातल्या १० आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे भाजपची विधानसभेतली संख्या आता २७ झाली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -