घरमहाराष्ट्रअजित पवार पुण्याचे मुख्यमंत्री आहेत का?; चंद्रकांत पाटील यांचा सवाल

अजित पवार पुण्याचे मुख्यमंत्री आहेत का?; चंद्रकांत पाटील यांचा सवाल

Subscribe

अजित पवारांना पुणे आंदण दिलंय का?

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज पुणे पालिकेत कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली. अजित पवार पुण्याचे मुख्यमंत्री आहेत का? असा सवाल देखील त्यांनी केला आहे. तर अजित पवार हेडमास्तर आहेत, म्हणून उद्धव ठाकरे यांनी अजित पवारांकडून काहीतरी शिकावं, असा सल्ला देखील त्यांनी दिला.

चंद्रकांत पाटील यांनी पुणे पालिकेत कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी अजित पवारांना पुणे आंदण दिलंय का, असा खोचक टोमणाही प्रदेशाध्यक्षांनी मारला. काही ठिकाणी अजित पवार मुख्यमंत्री, तर काही ठिकाणी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री. अजित पवार हे हेडमास्तर आहेत, म्हणून उद्धव ठाकरे यांनी अजित पवारांकडून काहीतरी शिकावं, असा सल्ला चंद्रकांत पाटलांनी उद्धव ठाकरेंना दिला.

- Advertisement -

तिघे एकत्र येऊन लढा, भाजप घाबरत नाही

राज्यातील पुढील निवडणुका शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढवण्याबाबत सुरु असलेल्या चर्चांवर चंद्रकांत पाटलांही थेट महाविकास आघाडीला आव्हान दिलं आहे. तिघे एकत्र येऊन लढा, भाजप त्याला घाबरत नाही आणि हे एकदा होऊन जाऊद्या, असं आव्हान चंद्रकांत पाटलांनी दिलं. सरकारमध्ये ज्या कुरबुरी सुरु आहेत, त्या फक्त स्वतःच्या ताटात काहीतरी पाडून घेण्यासाठी सुरु आहेत, असं चंद्रकांत पाटलांनी म्हटलं.

पोटदुखी आम्हाला झालेली नाही

सामनाचे कार्यकारी संपादक आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना दिलेल्या मॅरेथॉन मुलाखतीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पोटदुखी झाली असल्याचं म्हणत विरोधकांवर टीका केली. यावर बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, पोटदुखी आम्हाला झालेली नाही, म्हणून बाहेर फिरत आहोत. पोटदुखी झाली असेल, तर त्यांना झाली असेल, म्हणून त्यांच्या फिरण्यावर मर्यादा आल्या आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवशी शिवसेनेच्या रुग्णवाहिकांचं लोकार्पण


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -