घरमहाराष्ट्रटीईटी घोटाळा प्रकरणात सरकार नेमकं कोणाला पाठीशी घालतय? अजित पवारांचा थेट सवाल

टीईटी घोटाळा प्रकरणात सरकार नेमकं कोणाला पाठीशी घालतय? अजित पवारांचा थेट सवाल

Subscribe

शिक्षक भरतीसाठीच्या टीईटी परीक्षेतील घोटाळ्याचा मुद्दा आज विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी विधानसभेत उपस्थित केला. यावेळी टीईटी घोटाळा प्रकरणात सरकार नेमकं कोणाला पाठीशी घालतय? असा सवाल अजित पवारांनी केला. दरम्यान कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांचे नाव यापूर्वी टीईटी घोटाळ्यात समोर आले होते. त्यामुळे अजित पवारांनी याचवरून अप्रत्यक्षरित्या त्यांच्यावर निशाणा साधल्याचे बोलले जात आहे.

टीईटी घोटाळा प्रकरणात मेरीटच्या विद्यार्थ्यांचे अतोनात नुकसान झाले, जे कॉपी करून अभ्यान करता गौडबंगाल करून स्वत:ची निवड करुन घेणाऱ्यांचा फायदा झाला. त्यामुळे गैरप्रकार करून टीईटी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या आणि प्रमाणपत्र प्राप्त किती शिक्षकांची मान्यता आणि शालार्थ आयडी रद्द केले? आणि कधीपासून रद्द केले? याबाबत माहिती सभागृहाला देण्याची विनंती अजित पवार यांनी केली आहे.

- Advertisement -

टीईटी परीक्षा 2019 दिनांक 19 जानेवारी 2020 ही किती केंद्रांवर आयोजित केली होती. याप्रकरणी उच्च न्यायालयात सरकारने आपलं म्हणणं सादर केलं आहे, पण सरकार उच्च न्यायालयात आपली बाजू कधी मांडणार आहे. यात सरकार कोणाला पाठीशी घालत आहे का? असा सवालही अजित पवारांनी उपस्थित केला,

टीईटी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्यांमध्ये गुण वाढवून आणि बनावट प्रमाणपत्र प्राप्त झालेल्यांची संख्या किती? यात आत्ताच्या मंत्रिमंडळातील काही आमदार, शिक्षण विभागात काम करणारे अधिकारी कर्मचारी यांची मुलं आणि नातेवाईक यांच्या संख्या किती याची माहिती सभागृहाला मिळेल का? असा प्रश्न विचारत त्यांनी एकप्रकार सरकारमधील आमदारांना टार्गेल केले आहे.

- Advertisement -

हा आमचा अधिकार आहे म्हणून लोकांनी निवडून पाठवलं

याच मुद्द्यावर पुन्हा एकदा अजित पवार यांनी भाष्य केले. प्रश्न उपस्थित करणं आणि उत्तर मिळवणं हा आमचा अधिकार आहे. आम्हाला लोकांनी त्यासाठी निवडून पाठवलं आहे. तुम्ही अध्यक्ष आहात. आम्ही राजकीय भूमिकेतून प्रश्न कधीही विचारत नाही. माझीही ३०-३२ वर्ष झाली सभागृहात. मी राजकीय भूमिकेतून कधीही बोलत नाही. त्या प्रश्नाला न्याय मिळाला पाहिजे, असा शब्दात अजित पवार यांनी संताप व्यक्त केला.

जी बिचारी मुलं मेरिटची होती, ती बाजूला राहिली. पण ज्यांनी कॉपी केली ती मुलं पास झाली आणि नोकरीला लागली. हा कुठला न्याय? यासाठी मी सात प्रश्न विचारले होते. त्याचे उपप्रश्न आजच्या यादीत आलेच नाहीत. मला उत्तर मिळालं पाहिजे, असंही अजित पवार म्हणाले.

अधिवेशन संपण्यापूर्वी माहिती दिली जाईल – अध्यक्ष

अजित पवारांच्या प्रश्नांवर विधानसभा अध्यक्षांनी स्वत: या प्रकरणात लक्ष घालून कारवाईसंदर्भात माहिती सभागृहासमोर मांडण्याचं आश्वासन दिले. तसं झालं असेल, तर संबंधित अधिकारी, लोकप्रतिनिधींविरोधात कारवाई निश्चित केली जाईल. अधिवेशन संपण्यापूर्वी यासंदर्भातली माहिती सभागृहासमोर मांडेन, असं विधानसभा आश्वासनही अध्यक्षांनी दिले आहे.


नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील मृत्यूच्या घटना लाजीरवाण्या; अजित पवारांकडून सरकारवर प्रश्नांचा भडिमार

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -