घरमहाराष्ट्रAjit Pawar यांचा संजय राऊतांना टोला, म्हणाले - "सोम्या गोम्याला उत्तर..."

Ajit Pawar यांचा संजय राऊतांना टोला, म्हणाले – “सोम्या गोम्याला उत्तर…”

Subscribe

नागपूर : संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान काल (ता. 13 डिसेंबर) धक्कादायक घटना घडली. दोन तरूणांनी लोकसभेच्या प्रेक्षक गॅलरीमधून सभागृता उड्या मारल्या. इतकेच नाही तर त्यांनी “तानाशाही नही चलेगी…” अशा घोषणा देत गोंधळ घातला. त्यानंतर या तरूणांना ताब्यात घेण्यात आले. संसदेच्या आवारातही एका तरुणाने स्मोक कँडल पेटवून गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. या तरूणांमध्ये एक तरुण हा महाराष्ट्रातील असून अमोल शिंदे असे या तरुणाचे नाव आहे. हा तरुण लातूर जिल्ह्यातील असल्याचे तपासात उघड झाले आहे. त्या या घटनेत एका तरुणीचा समावेश असून ही तरूणी पीएचडी अभ्यासक्रमाची विद्यार्थिनी असल्याची माहिती समोर आली आहे. (Ajit Pawar’s taunt to Sanjay Raut, said – “An answer to Somya Gomya…”)

हेही वाचा – Sanjay Raut : संसद भवनातील घुसखोरीवरून संजय राऊतांची सरकारवर टीका, नवीन संसदभवन…

- Advertisement -

काल घडलेल्या घटनेतील तरूणी ही पीएचडीचा अभ्यास करत असल्याची माहिती समोर आल्यानंतर या प्रकरणावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. ज्या तरुणांना पकडले. त्यांचा मार्ग चुकीच आहे. त्यांनी मांडलेल्या भावना देशाच्या हिताच्या होत्या. त्यांना वडे तळायला देखील कुठ जागा नाही. त्यातील एक मुलगी PHD करत आहे. तिला अजित पवार यांनी मार्गदर्शन करावे, असा टोला संजय राऊत यांनी अजित पवार यांना लगावला. पण त्यांच्या या टोल्याला आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून उत्तर देण्यात आले आहे.

नागपुरात आज (ता. 14 डिसेंबर) प्रसार माध्यमांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना संजय राऊतांनी केलेल्या टीकेबाबत प्रश्न विचारला. यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले की, “कोणाही सोम्या गोम्याच्या टीकेला उत्तर देण्यासाठी मी अजित पवार बांधील नाही.” यावेळी त्यांनी विधान परिषदेत केलेल्या पीएचडीच्या वक्तव्याबाबतही स्पष्टीकरण दिले आहे. “पीएचडीबाबत माझा तोंडतून शब्द गेला काय दिवा लावला जाणार आहे. त्याचा गाजावाजा करण्यात आला. जे मी बोललो त्याचा विपर्यास केला गेला. त्याबाबत मी दिलगिरी व्यक्त केली आहे. अनेकांनी राजकिय नेत्यांवर पीएचडी केली. पीएचडी करण्यावर दुमत नाही. पीएचडी करण्याबाबत विषय निवडीबाबत समिती नेमायला हवी. अनेक जण विविध विषयात पीएचडी करतात. जर्मन भाषेत पीएचडी केली तर अधिक फायदा होईल,” असे स्पष्टीकरण अजित पवार यांच्याकडून देण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -