घरमहाराष्ट्रनागपूरपुण्यात रस्ता ओलांडत असताना घात झाला; पाच महिलांवर काळाचा घाला

पुण्यात रस्ता ओलांडत असताना घात झाला; पाच महिलांवर काळाचा घाला

Subscribe

पुणे – खेड तालुक्यातील शिरोली गावाजवळ भीषण अपघात होऊन पाच महिलांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर, १३ जणी जखमी असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. सध्या जखमींवर पुण्यात आणि चाकणमध्ये उपचार सुरू आहेत.

खेड तालुक्यातील खरपुडी फाट्यावर असणाऱ्या मंगल कार्यालयात १८ महिला कार्यरत होत्या. त्यांचा पुणे नाशिक मार्गाने लग्न कार्यकर्मात स्वयंपाकी आणि वाढपी म्हणून कामासाठी जात होत्या. यावेळी पुणे नाशिक महामार्गावरील शिरोली गावाजवळ या महिला रस्ता ओलांडत होत्या. त्यावेळी पुण्याच्या दिशेकडून येणाऱ्या एका भरधाव वाहनाने महिलांच्या गटाला चिरडले. यात पाच महिला जागीच ठार झाल्या. तर, १३ जणी जखमी आहेत. यापैकी काही महिला गंभीर जखमी असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्यावर चांडोली ग्रामीण रुग्णलाय, राजगुरु परिसरातील चार ते पाच खासगी रुग्णलायात उपचार सुरू आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – सोलापूर-धुळे महामार्गावर भीषण अपघात, आमदाराच्या मामाचा जागीच मृत्यू

काल नाशिकमध्ये भीषण अपघात

- Advertisement -

मध्य रेल्वेच्या मनमाड सेक्शन युनिट २ मध्ये ट्रॅकचे काम करणाऱ्या चार रेल्वे कामगारांना टाॅवर मशिनने चिरडले होते. यामुळे या कामगारांचा जागीच मृत्यू झाला असून रेल्वे प्रशासनाकडून चौकशीचे आदेश देण्यात आले. निफाड तालुक्यातील उगाव येथे रेल्वे ट्रॅकवर ट्रॅक मन व ओव्हर हेड इक्विपमेंट (टाॅवर) मशिन असे दोन पथकांना काम करण्यासाठी सोमवारी (दि.१३) पहाटे ब्लाॅक (सुरक्षित वेळ) मिळाला होता. त्यानुसार नाशिकरोड येथील टाॅवर वॅगन लासलगावच्या दिशेने गेले. मशिन पुढे गेल्याने उगाव येथील रेल्वे ट्रॅकला वळण असलेल्या ठिकाणी ट्रॅकमन यांनी काम सुरू केले होते. काम सुरू असताना लासलगाव येथून उलट्या दिशेने वेगाने आलेल्या टाॅवर मशिनने ट्रॅकवर काम करणाऱ्या कृष्णा अहिरे (मुकादम), दिनेश दराडे (ट्राॅली मॅन), संतोष केदारे व संतोष शिरसाठ यांना चिरडले.

हेही वाचा – नाशिकमध्ये भीषण अपघात; विरुद्ध दिशेने आलेल्या रेल्वेच्या इंजिनामुळे चार कर्मचाऱ्यांचा मृत्यू

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -