घरमहाराष्ट्रAmitabh Bachchan : 'बिग बी' म्हणणार, मी 'अलिबाग'कर!

Amitabh Bachchan : ‘बिग बी’ म्हणणार, मी ‘अलिबाग’कर!

Subscribe

हिंदी सिनेसृष्टीचे महानायक आणि बिग बी अमिताभ बच्चन लवकरच मी अलिबागकर बोलणार आहेत. कारण त्यांनी आता अलिबागमध्ये तब्बल १० कोटींची जागा घेतली आहे. मुंबईत असूनही त्यांनी इतर सिनेस्टारसारखी अलिबागमध्ये जागा घेतली नव्हती. ही त्यांची उणीव आता पूर्ण झाली आहे.

विशेष प्रतिनिधी : आपलं महानगर वृत्तसेवा

अलिबाग : हिंदी सिनेसृष्टीत अमिताभ बच्चन म्हणजे ‘सिर्फ नाम ही काफी है’! हिंदी फिल्म इंडस्ट्रीचे शहनशाह, महानायक असलेले अमिताभ बच्चन २१व्या शतकात ‘बिग बी’ म्हणून ओळखले जातात. आता लवकरच त्यांची ओळख ‘मी अलिबागकर’ अशी झाल्यास कुणाला आश्चर्य वाटू नये. याला कारणही तसेच आहे. अमिताभ बच्चन यांनीही अलिबागमध्ये मोठी जागा खरेदी केली आहे.

काही महिन्यांपूर्वी अमिताभ बच्चन यांनी अयोध्येत जमीन खरेदी केल्याची बातमी झळकली होती. अमिताभ बच्चन अनेक ठिकाणी जमिनी खरेदी करतात पण बॉलीवूडमधील बहुतांश स्टार आणि उद्योगपतींचे बंगले अलिबागमध्ये आहेत त्या भूमीत त्यांची वास्तू नव्हती. ती कमतरता आता भरून निघणार आहे. त्यांनी गेल्या वर्षी अलिबागमध्ये १० हजार चौरस फुटांची जागा द हाऊस ऑफ अभिनंदन लोढा यांच्याकडून खरेदी केली आहे. हा सौदा १० कोटींचा असल्याची चर्चा आहे.

- Advertisement -

हेही वाचा… Lok Sabha Election 2024 : पक्षफुटींची झळ की सहानभुतीचा फायदा?

अमिताभ बच्चन मालमत्ता खरेदीबाबत अत्यंत चोखंदळ आहेत. अयोध्येतील राममंदिर पूर्णत्वाच्या मार्गावर असताना त्यांना द शरयू या प्रकल्पात १० हजार चौरस फुटांची जागा १४.५ कोटींनी विकत घेतली. त्यावेळी अयोध्येविषयी माझ्या मनात विशेष स्थान असल्याचे म्हटले होते. आता त्यांनी अलिबागमध्ये जागा घेऊन शाहरूख खान, अनुष्का शर्मा, दीपिका पदुकोन-रणवीर सिंग आदी कलाकारांच्या खांद्याला खांदा मिळवला आहे.

- Advertisement -

हेही वाचा… ‘प्रीत अधुरी’ चित्रपटाचा अल्ट्रा झकासवर वर्ल्ड डिजिटल प्रीमियर!

अमिताभ बच्चन यांचे मुंबईतील जुहू भागात वास्तव्य आहे. जुहूमध्ये प्रतीक्षा, जलसा आणि जनक हे त्यांचे तीन प्रशस्त बंगले आहेत. त्यातील प्रतीक्षा हा बंगला त्यांनी गेल्या वर्षी त्यांची कन्या श्वेता नंदा यांना भेट दिला.

(Edited by Avinash Chandane)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -