घरताज्या घडामोडीAmravati violence : अमरावती शहरात संचारबंदी लागू, इंटरनेट ठप्प

Amravati violence : अमरावती शहरात संचारबंदी लागू, इंटरनेट ठप्प

Subscribe

अमरावती शहर भागात कोणताही हिंसाचार किंवा अनुचित प्रकार घडू नये यासाठी अखेर अमरावती शहरात संचारबंदीची घोषणा करण्यात आली आहे. अमरावतीचे प्रभारी पोलिस आयुक्त संदीप पाटील यांनी एक पत्रक जाहीर करत संचार बंदीची घोषणा केली आहे. आज दुपारी २ वाजल्यापासूनच संचारबंदी लागू झाल्याचा उल्लेख परिपत्रकात आहे. संचारबंदीचा आदेश ध्वनीक्षेपकाद्वारे जाहीर करत, त्याबाबत जनजागृती करावी, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. अमरावती शहरात रझा अकादमीने शुक्रवारी काढलेला मोर्चा आणि आज शनिवारी भाजप बंदच्या आवाहनानंतर उफाळलेला हिंसाचार पाहता अमरावती शहरातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडली होती. आजच्या अमरावती बंदला हिंसक वळण लागल्यानेच गृह विभागाकडून तातडीचा उपाय म्हणून संचारबंदीची घोषणा करण्यात आली आहे. इंटरनेट सेवाही ठप्प झाल्याची माहिती एका वृत्तवाहिनीने दिली आहे. कोणत्याही अफवा या कालावधीत पसरू नये, यासाठीच हा खबरदारीचा उपाय करण्यात आला आहे.

संचारबंदीच्या कालावधीत शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून १३ नोव्हेंबरपासून दुपारी २ वाजल्यापासून संचारबंदीचा आदेश अमरावती शहराचे प्रभारी पोलिस आयुक्त संदीप पाटील यांनी जाहीर केला आहे. या संचारबंदीच्या कालावधीत कोणत्याही व्यक्ती वैद्यकीय कारण वगळता इतक कारणाकरिता बाहेर पडणार नाहीत, असेही स्पष्ट केले आहे. तसेच पाचपेक्षा जास्त व्यक्ती एकत्रित जमाणार नाही. या कायद्याच्या आदेशाचा भंग करणाऱ्या व्यक्तीविरोधात आयपीसीनुसार कारवाई करण्यात येईल असेही स्पष्ट करण्यात आले आहे. शिक्षा पात्र अपराध केल्या असल्याचे सांदगगूनच या प्रकरणी कारवाई करण्यात येईल असे पत्रकात नमुद करण्यात आले आहे. सर्व पोलिस ठाण्यांसाठी ही माहिती जारी करण्यात आली आहे.

- Advertisement -

राज्यात त्रिपुरातील घटनेचे पडसाद विविध शहरांमध्ये उमटले होते. त्यामध्ये अमरावतीत रझा अकादमीने शुक्रवारी मोर्चाही काढला होता. पण या मोर्चात गर्दी वाढल्याने मोर्चाला हिंसक वळण लाभले. परिणामी काही भागात दगडफेकीचे प्रकारही समोर आले. या घटनेनंतर आज शनिवारी भाजपने अमरावती शहर बंदची हाक दिली होती. या बंदच्या निमित्ताने शहरातील राजकमल चौकातून मोर्चाही काढण्यात येणार होता. पण आंदोलनकर्त्यांनी हिंसा करत शहरातील अनेक भागात दुकानांची आणि वाहनांची तोडफोड केली. त्याचाच परिणाम म्हणून कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी एसआरपीएफ पाचारण करण्यात आले. तसेच नजीकच्या शहरातूनही त्याठिकाणी पोलिस दलाची अतिरिक्त कुमक मागविण्यात आली. जमाव पांगवण्याच्या प्रयत्नामध्ये अनेक पोलिस दोन दिवसात झालेल्या घटनांमध्ये जखमीही झाले आहेत.


Amravati violence: भाजपच्या अमरावती बंदला हिंसक वळण, दुकाने, वाहनांची तोडफोड

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -