घरमहाराष्ट्रआनंद महिंद्रांनी व्हिडीओ ट्विट करत विचारला प्रश्न, बरोबर उत्तर देणाऱ्याला मिळणार ट्रॅक्टर

आनंद महिंद्रांनी व्हिडीओ ट्विट करत विचारला प्रश्न, बरोबर उत्तर देणाऱ्याला मिळणार ट्रॅक्टर

Subscribe

महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ आणि काही फोटो शेअर करत एक प्रश्न विचारला होता. महिंद्रा यांनी यात असा प्रश्न विचारला आहे की, जो कोणी व्यक्ती वाहन निर्यात केलेल्या देशाबाबत सांगेल त्याला व्हिडिओमध्ये दिसणार्‍या ट्रॅक्टरपैकी एक स्केल मॉडेल ट्रॅक्टर दिला जाईल. महिंद्रा यांनी ट्विटमध्ये पुढे लिहिले की, “नक्कीच हे महिंद्राचे ट्रॅक्टर आहेत पण हे कोणत्या देशाचे आहे? योग्य उत्तर देणाऱ्या व्यक्तीला फोटोत दिसणारा एक स्केल मॉडेल ट्रॅक्टर पाठवला जाईल.

व्हिडिओमध्ये काय आहे?

व्हिडीओमध्ये अनेक ट्रॅक्टर रांगेत उभे असल्याचे दिसत आहे, त्यापैकी दोन ड्रायव्हर दिसत आहेत. पहिली ट्रॅक्टर ट्रॉली सजवण्यात आली असून ज्याच्यामागे शिलाई मशीन आणि इतर गोष्टीही दिसत आहेत. एका ट्रॅक्टरवर एक महिला हसताना दिसत आहे. ज्याच्या ट्रॉलीवर लाकडी नाव दिसत असून सजावट करण्यात आली आहे. या रांगेत काचेचं केबिन असलेल्या ट्रॅक्टरजवळ एक तरुण स्त्री, कमरेवर एका मुलीला घेऊन उभी असलेली स्त्री आणि एक पुरुष दिसत आहे. या ट्रॅक्टरची ट्रॉलीही सजलेली दिसत आहे.

- Advertisement -

व्हिडीओत दिसतेय की, हे ट्रॅक्टर कोणत्यातरी झांकी समारंभ सहभागी झाले होते. याशिवाय आनंद महिंद्राने दोन फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये महिंद्रा ट्रॅक्टरचे अर्जुन नोवो मॉडेल दिसत आहे. ट्रॅक्टरच्या फोटो असलेल्या बॉक्सवर लिहिले आहे की, “अशक्यांना शक्य करणारे तंत्रज्ञान”.

- Advertisement -

महिंद्रा वेबसाइटवर काय म्हटले आहे?

महिंद्रा तीन दशकांहून अधिक काळ ट्रॅक्टरचा अग्रगण्य ब्रँड आहे. व्हॉल्यूमनुसार ही जगातील सर्वात मोठी ट्रॅक्टर उत्पादक कंपनी आहे. महिंद्राने त्यांच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, महिंद्रा 40 हून अधिक देशांमध्ये गुणवत्तेत अग्रगण्य आहे. इतकेच नाही आत्तापर्यंत डेमिंग अवॉर्ड आणि जपानी क्वाॉलिटी मेडल जिंकणारा महिंद्रा हा जगातील एकमेव ट्रॅक्टर ब्रँड आहे.

महिंद्रांनी एका अजब वाहनाचाही फोटो केला होता शेअर

भारतातील प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा ट्विटवर खूप अॅक्टिव्ह असतात. ते अनेकदा वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ आणि फोटो शेअर करत असतात. जे अनेकदा तुफान व्हायरलही होतात. यात मंगळवारी देखील असाच एका अजब गजब इलेक्ट्रिक वाहनाचा व्हिडीओ शेअर केला होता. ज्यातील वाहन विविध भूप्रदेशात जसे की खडक, वाळू आणि बर्फाच्छादित भूभागापर्यंत चालवली जाऊ शकते.

फ्रेंच बनावटीच्या या वाहनाचा व्हिडीओ शेअर करताना महिंद्रा यांनी लिहिले की, ‘हे अद्भूत आहे. चाकं असलेला एक कोळी. मनोरंजनाच्या उद्देशाने हा वॉल्यूम विकणारा असेल हे निश्चित नाही. संरक्षण आणि निमलष्करी दलाच्या जवानांसाठी हे संभाव्य गतिशीलता साधन? @vijaynakra @Velu_Mahindra तुम्हाला काय वाटते?

स्विंकार ई-स्पायडरच्या वेबसाइटनुसार, ” हे वाहन फक्त हातांनी नियंत्रित केले जाऊ शकते, हे वाहन अगदी कमी वेग असलेल्या व्यक्तींसाठी देखील हे सुलभ आहे. हे पेटंट पेंडुलम डिझाइनद्वारे तयार करण्यात आलेले वाहन आहे, जे संतुलन राखण्यास सक्षम आहे, जसे की खडबडीत आणि वाकड्या तिकड्या जमिनीवरही हे वाहन चढते किंवा उतरते.


शिंदे – फडणवीस सरकारचा निर्णय शेतकऱ्यांना दिलासा देणारा; बावनकुळेंकडून स्तुतिसुमनं


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -