घरमहाराष्ट्रVideo : अनिल परबांनी पोलिसांना दिले राणेंना अटक करण्याचे आदेश

Video : अनिल परबांनी पोलिसांना दिले राणेंना अटक करण्याचे आदेश

Subscribe

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारे केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांना काल अटक करुन जामीन देखील मिळाला. मात्र, राणेंच्या अटकेची इनसाईड स्टोरी आता समोर आली आहे. एक व्हिडिओ आता समोर आला आहे, ज्यामध्ये परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab Video) नारायण राणे यांना अटक करण्यासाठी पोलिसांना आदेश देत असल्याचं स्पष्ट दिसतंय. भाजपचे आमदार नितेश राणे यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे.

नारायण राणे यांना अटक होण्यापूर्वी अनेक घडामोडी घडल्या. राणेंना अटक करण्यापूर्वी भाजप नेते ठिय्या मांडून बसले. अटक वॉरंट दाखवा, तरच कारवाई करा, असं भाजप नेते म्हणत होते. तसंच, पोलिसांवर राजकीय दबाव आहे, कारवाई करण्याचे आदेश येत आहेत, असंही भाजप नेते म्हणत होते. प्रसाद लाड यांनी तर अटक करण्यासाठी दबाव टाकत असल्याचा एका मंत्र्यांचा व्हिडिओ आला आहे, असा दावा केला होता. दरम्यान, आता हा व्हिडिओ समोर आला आहे.

- Advertisement -

भाजपच्या या दाव्यानंतर राज्याचे परिवहन मंत्री आणि शिवसेना नेते अनिल परब यांच्या पत्रकार परिषदेचा व्हिडीओ समोर आला आहे. अनिल परब यांनी रत्नागिरीत पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांना पोलिसांचे फोन येत होते.

अनिल परब यांना पोलिसांचा फोन आला. यावेळचं संभाषण रेकॉर्ड झालं आहे. मी सध्या रत्नागिरीत आहे. मी आता विचारुन घेतो सीएम साहेबांना. हो… फक्त मी ठरवतो, मग तसं आपल्याला ताबडतोब ब्रीफ करावं लागेल ना? हो हो हो… मग कोणाला सांगू ब्रीफ करायला? डीजींना सांगतो. मी डीजींना सांगतो. हो… ठिक आहे, मी आता डीजींना सांगतो ताबडतोब… ठिकेय मी आता ताबडतोब बोलतो.

- Advertisement -

त्या दरम्यान आमदार भास्कर जाधव हे मोबाईलमधील काहीतरी मेसेज अनिल परब यांना दाखवतात. भास्कर जाधव म्हणतात, हाय कोर्टाने पण नकार दिलाय..

त्यानंतर काही वेळाने अनिल परब फोन लावतात.

हॅलो, काय करताय तुम्ही लोकं??

नाय पण ते करावं लागेल तुम्हाला.. तुम्ही.. घेताय की नाही ताब्यामध्ये?
हं
ऑर्डर कसली मागतायत ते? नाही नाही ऑर्डर कसली मागतायेत ते?

अहो कोर्टाने जे काय आहे ते हायकोर्ट ते येणार नाही कॉन्फिडन्समध्ये

हायकोर्ट आणि सेशन कोर्ट दोघांनीही त्यांचा जामीन नाकारला आहे.

पण मग घ्या ना,,, पोलीस फोर्स वापरुन करा… अहो वेळ लागणार मग कोर्टबाजी चालूच आहे ना त्याची

ठिकाय.. ओके

फोन बंद झाल्यानंतर भास्कर जाधव अनिल परबांना म्हणतात, नारायण राणेला ताब्यात घेतलाय वाटतं..

मग अनिल परब भास्कर जाधवांना म्हणतात, घरात बसलाय, पोलिसांनी वेढा घातलाय, पोलीस आतमध्ये गेले तेव्हा धक्काबुक्की झाली
आता पोलीस ओढून बाहेर काढतायेत..

भास्कर जाधव म्हणतात.. चला आता (पत्रकार परिषद) संपवायला हवं.

त्यादरम्यान पत्रकार अनिल परब यांना विचारतात, नारायण राणे यांना अटक झाली आहे का?

त्यावर अनिल परब म्हणतात.. मला अजून त्याबाबतची माहिती मिळालेली नाही, त्यामुळे मी आता सांगू शकत नाही अटक झाली की नाही.
मी इथे तुमच्यासमोर बसून आहे. मी तुम्हाला त्याबाबत काय सांगू.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -