Eco friendly bappa Competition
घर महाराष्ट्र अनिल परब 16 आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात म्हणाले...

अनिल परब 16 आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात म्हणाले…

Subscribe

पंढरपूर : राज्य सरकार वाचवण्यासाठी वेळ काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. 16 आमदार अपात्र होणे म्हणजे राज्य सरकार जाणे आहे, अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी दिली आहे. अनिल परब हे आज पंढरपूरमध्ये विठ्ठुरायाच्या दर्शनासाठी आले असतना त्यांनी 16 आमदार उपात्रसंदर्भात उद्या होणाऱ्या सुनावणीवर माध्यमांशी बोलले.

शिवसेनेच्या 16 आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात अनिल परब म्हणाले, “सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या मार्गदर्शन तत्वे घालून दिली आहे आणि यांचा अर्थ लावून सर्वोच्च न्यायालयाने पाठविले आहे. सध्या राज्य सरकार वेळ काढण्याचा प्रयत्न करीत आहेत. सर्वोच्च न्यायालयाने राज्यपालांची भूमिका, 10 वे कलम या सर्व बाबतीत सांगितले आहे. यात पक्षांतर्गत बंदीबद्दल सर्व नियम स्पष्ट केले आहेत. पण आता सरकार वाचवण्यासाठी वेळ काढूपणा करू आहे. जर 16 आमदार अपात्र होणे म्हणजे राज्य सरकार जाणार आहे.”

- Advertisement -

हेही वाचा – Breaking : मनोज जरांगेंचे उपोषण सुटणार कधी? जालन्याला जाण्याबाबत मुख्यमंत्री शिंदेंची अनिश्चितता

उद्धव ठाकरेंवी टीकेसंदर्भात अनिल परब म्हणाले…

उद्धव ठाकरेंवरील टीकासंदर्भात अनिल परब म्हणाले, “ते त्याच्या लायकीप्रमाणे सुरू आहेत, असा टोला त्यांनी नितेश राणे आणि चित्र वाघ यांना लगावला आहे. पुढे अनिल परब म्हणाले, “मनोज जरांगे पाटलांचे उपोषण हे मराठा आरक्षणासाठी नव्हते. तर मराठावाड्यातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी आहे, असे त्यांनी म्हणाले.

- Advertisement -

मराठा आरक्षण हे सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक मागासलेपणा सिद्ध झाल्याशिवाय मराठा समाजाला टिकाणारे आरक्षण मिळणार नाही. त्यासाठी मराठा समाजाचा योग्य इम्परिकल डाटा मागास आयोगाने देणे गरजेचे आहे, असेही अनिल परब म्हणाले.

 

- Advertisment -