घर राजकारण अजित पवार यांच्यासोबत मतभेद असल्याच्या चर्चांवर जयंत पाटलांचं सूचक वक्तव्य; म्हणाले...

अजित पवार यांच्यासोबत मतभेद असल्याच्या चर्चांवर जयंत पाटलांचं सूचक वक्तव्य; म्हणाले…

Subscribe

कोल्हापूरनंतर त्यांच्या जळगाव आणि पुणे येथे सभा होणार आहेत. कोल्हापूर हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे. तो राष्ट्रवादीनेच लढावा अशी इच्छा आहे, असं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले.

कोल्हापूर: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची 25 ऑगस्ट रोजी कोल्हापुरात सभा होणार आहे. या सभेसाठी कोल्हापूर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते येणार आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी आग्रह केल्यामुळेच शरद पवार यांची कोल्हापुरात सभा होत आहे. कोल्हापूरनंतर त्यांच्या जळगाव आणि पुणे येथे सभा होणार आहेत. कोल्हापूर हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे. तो राष्ट्रवादीनेच लढावा अशी इच्छा आहे, असं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले. (Jayant Patil s suggestive statement on talks of differences with Ajit Pawar )

काय म्हणाले जयंत पाटील?

शरद पवार नेहमीच पुरोगामी विचरांचे राहिले आहेत. शाहू, फुले, आंबेडकर यांचे विचार महाराष्ट्रात जपणे आवश्यक आहे. जनतेमध्ये समतेचा संदेश देणं गरजेचं आहे. शरद पवार ओबीसी नेत्यांना टार्गेट करत आहेत. हा गैरसमज काही जण पसरवत आहेत, असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. लोकसभा निवडणूक खूप लांब आहे. पक्ष फोडण्याचं काम सुरू आहे. शरद पवार जनतेपर्यंत जाऊन आपली भूमिका स्पष्ट करतील. हसन मुश्रीफ यांना शरद पवारांबाबत आदर आहे. मात्र, त्यांनी हा निर्णय का घेतला हे तेच सांगतील. कोल्हापुरच्या सभेत याची उत्तरं मिळतील. महाविकास आघाडीच्या सभा लवकर सुरू होतील, अशी माहीत जयंत पाटील यांनी दिली आहे.

अजित पवार आणि माझ्यात वाद नाहीत 

- Advertisement -

जयंत पाटील म्हणाले की, जे पवार साहेबांना सोडून गेले ते आजही साहेबांना मानतात. ते आग्रहाने सांगतात की ते माझा विठ्ठल आहे. जे गेले ते पवार साहेबांचा फोटो लावतात त्यावर मी आक्षेप घेणं बरोबर नाही. पवार साहेबांनी राजकारणात त्यांनी आणलं नसतं तर ते आजपर्यंत या ठिकाणी पोहोचले नसते. अजित पवार आणि माझ्यामध्ये कोणतेच वाद नाही. आम्ही पवार साहेबांचे कार्यकर्ते आहोत. त्यांच्यासोबत राहिलो आहे, असं पाटील म्हणाले.

मलिकांच्या भेटीत राजकीय चर्चा नाही

राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक हे बाहेर आले. त्यानंतर आम्ही काहीजणांनी जाऊन त्यांची भेट घेतली. मलिक यांना किडनीचा त्रास सुरू झाला आहे. विश्रांती घेण्यासाठी न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला आहे. ते राजकीय विषय कोणाशीही बोलत नाहीत, त्यामुळे त्यांच्या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. मात्र, त्यांच्यासंदर्भात राजकीय बोलून मी त्यांना अडचणीत आणणार नाही, असं जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.

- Advertisement -

( हेही वाचा: ‘त्या’ 12 आमदारांची यादी शिंदे-फडणवीस सरकारकडे कशी आली? प्रतित्रापत्रातून खुलासा )

- Advertisment -