घरमहाराष्ट्रअर्णब गोस्वामी यांची रवानगी क्वारंटाईन सेलमध्ये

अर्णब गोस्वामी यांची रवानगी क्वारंटाईन सेलमध्ये

Subscribe

अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना अलिबागच्या मुख्य न्यायदंडाधिकारी यांनी न्यायालयीन कोठडी सुनावली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अर्णब गोस्वामी यांची रवानगी अलिबाग मध्यवर्ती कारागृहाच्या क्वारंटाईन सेलमध्ये केली आहे. या सेलमध्ये ४० कैदी आहेत. अर्णब गोस्वामी सोबत फिरोज शेख आणि नितेश सारडा यांना देखील क्वारंटाईन सेलमध्ये ठेवण्यात आले आहे.

कोरोनामुळे अलिबाग मध्यवर्ती कारागृहाने नगर पालिकेच्या शाळेच्या इमारतीत क्वारंटाईन सेल उभारला आहे. या सेलमध्ये नवे कैदी दाखल होतात त्यांना ठेवतात. अर्णब यांना न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर या क्वारंटाईन सेलमध्ये ठेवण्यात आले आहे. जोपर्यंत त्यांना जामीन मिळत नाही तोपर्यंत त्यांना क्वारंटाईन सेलमध्येच ठेवले जाणार आहे. तिघांनाही क्वारंटाईन सेलच्या एक नंबर रुममध्ये ठेवण्यात आले आहे.

- Advertisement -

अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी बुधवारी (४ नोव्हेंबर) पोलिसांनी अर्णब गोस्वामी, फिरोज शेख आणि नितेश सारडा या तिघांना अटक केली. त्यानंतर त्यांना अलिबागच्या मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर केले. मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी या तिघांना १४ दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली. दरम्यान, या तिघांनी जामीन अर्ज दाखल केला असून उद्या या जामीन अर्जांवर सुनावणी होण्याची शक्यता आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -