घरमहाराष्ट्र'एक अधिकारी आपलं काम करतोय तर सरकारमधील मंत्री धमकी देतायत'

‘एक अधिकारी आपलं काम करतोय तर सरकारमधील मंत्री धमकी देतायत’

Subscribe

राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे उपाध्यक्ष अरुण हलदर प्रतिक्रिया

एक अधिकारी आपलं काम करतोय तर महाराष्ट्र सरकारचा मंत्री त्या अधिकाऱ्याला जेलमध्ये टाकण्याची धमकी देत आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे उपाध्यक्ष अरुण हलदर यांनी दिली. हलदर यांनी आज माध्यमांशी बोलताना ही प्रतिक्रिया दिली. एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी काल अरुण हलदर यांची भेट घेतली होती.

एक अधिकारी आपलं काम करत आहे. मात्र, महाराष्ट्र सरकारचा एक मंत्री त्या अधिकाऱ्यावर व्यक्तिगत आरोप करत आहे. अधिकाऱ्याला जेलमध्ये टाकण्याची धमकी देत आहे. यामागे कारण काय? त्याची चौकशी झाली पाहिजे, असं मत अरुण हलदर यांनी व्यक्त केलं. तसंच पुढे बोलताना संबंधित अधिकारी मदतीसाठी आयोगासमोर आला होता. त्यांनी आपली व्यथा मांडली आहे. आम्ही त्याची चौकशी करत आहोत, असं सांगितलं.

- Advertisement -

त्यांचं जात प्रमाणपत्र योग्य

अरुण हलदर यांनी समीर वानखेडे यांचं जातप्रमाणपत्र योग्य असल्याचं म्हटलं आहे. अनुभवाने मी सांगतो की, त्यांचं जात प्रमाणपत्र योग्य आहे, असं हलदर म्हणाले. मात्र, अजून आम्ही आयोगामार्फत समीर वानखेडेंच्या जात प्रमाणपत्राची चौकशी करत आहोत. एक अधिकारी आपलं चुकीचा दाखला आयोगासमोर देणार नाही. कारण, त्याची नोकरी धोक्यात येणार आहे. माझ्या माहितीप्रमाणे काही लोक समीर वानखेडे यांचं जात प्रमाणपत्र खोटं ठरवण्याचा प्रयत्न करत आहेत. पण आयोगाकडून हे होऊ दिलं जाणार नाही, असं अरुण हलदर म्हणाले.

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -