Eco friendly bappa Competition
घर ताज्या घडामोडी शिंदे-पवार भेटीनंतर आशिष शेलार मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, नेमकं चाललंय काय?

शिंदे-पवार भेटीनंतर आशिष शेलार मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, नेमकं चाललंय काय?

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांची वर्षा निवासस्थानी जाऊन भेट घेतली. त्यानंतर आता मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार (Ashish Shelar) वर्षा बंगल्यावर दाखल झाले आहेत. दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यात बैठक झाली होती. त्यानंतर शरद पवार यांनी आज मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली. आता आशिष शेलार मुख्यमंत्र्यांच्या भेटीला वर्षा बंगल्यावर आले आहेत. तसेच हातात काही कागदपत्रं घेऊन शेलार वर्षावर दाखल झाले आहेत. या भेटीमागचे कारण अद्यापही समोर आले नाही. मात्र, राजकीय भेटीगाठींचे हे सत्र सुरूच आहे.

नेमकं चाललंय काय?

शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. या दोघांमध्ये जवळपास ४० मिनिटं चर्चा झाली. या दोघांच्या भेटीमागचं कारण समोर आलेलं नव्हतं. मात्र, या भेटीत शरद पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मराठा मंदिर संस्थेच्या कार्यक्रमाचं आमंत्रण दिलं.

- Advertisement -

या भेटीनंतर एकनाथ शिंदेंनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, शरद पवारांसोबत कुठलीही राजकीय चर्चा झाली नाही. ही फक्त सदिच्छा भेट होती आणि मराठा मंदिर संस्थेच्या कार्यक्रमाचं आमंत्रण देण्यासाठी ही भेट होती. तसेच या भेटीत कोणत्याही प्रकारची राजकीय चर्चा झाली नाही, असं स्पष्टीकरण एकनाथ शिंदे यांनी दिलं.

दरम्यान, वर्षा निवासस्थानाबाहेर आल्यानंतर शरद पवार यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. शरद पवार यांनी आपल्या अधिकृत ट्वीटर अकाउंटवरून यासंदर्भात स्पष्टीकरण दिलं.

काय म्हणाले शरद पवार?

- Advertisement -

मराठा मंदिर, मुंबई संस्थेच्या अमृत महोत्सवी वर्धापन दिनानिमित्त वर्धापन सोहळ्याचे आयोजन संस्थेतर्फे करण्यात येणार आहे. संस्थेचा अध्यक्ष या नात्याने आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना या कार्यक्रमाला आमंत्रित करण्यासाठी वर्षा या त्यांच्या शासकीय निवासस्थानी त्यांची भेट घेतली. यासोबतच महाराष्ट्रातील मराठी चित्रपट, नाट्य व कला क्षेत्रातील कलावंत, कारागीर यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी बैठक आयोजित करण्याबाबत व सदर बैठकीस चित्रपट, नाट्य, लोककला, वाहिन्या व इतर मनोरंजन माध्यमांतील संघटनांना निमंत्रित करण्याबाबत मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा केली, असं ट्वीट शरद पवार यांनी केलं आहे.


हेही वाचा : शरद पवारांची सदिच्छा भेट; मुख्यमंत्री शिंदेंनी सांगितलं ‘हे’ कारण…

अदानी पवारांच्या भेटीला ‘सिल्व्हर ओक’वर

शरद पवार हे एकनाथ शिंदे यांच्या भेटीला वर्षा बंगल्यावर गेले होते. त्यानंतर उद्योगपती गौतम अदानी यांनी सिल्व्हर ओकवर शरद पवारांची भेट घेतली. गौतम अदानी यांची पवार आणि भाजपशी जवळीक नातं आहे. कारण याआधी देखील अदानी यांनी पवारांची भेट घेतली होती. त्यामुळे ही भेटही अत्यंत महत्त्वाची समजली जात आहे.


हेही वाचा : Adani Pawar meet: उद्योगपती गौतम अदानी पवारांच्या भेटीला ‘सिल्व्हर ओक’वर


 

- Advertisment -