घरताज्या घडामोडीAshish Shelar : राऊतांच्या डोक्यात सतत औरंगजेबाचेच विचार - आशिष शेलार

Ashish Shelar : राऊतांच्या डोक्यात सतत औरंगजेबाचेच विचार – आशिष शेलार

Subscribe

संजय राऊत यांच्या डोक्यात छत्रपती शिवाजी महाराज कमी आणि अफझलखान व औरंगजेबच सतत असतात. त्यामुळेच त्यांना अफझलखान व औरंगजेब वारंवार आठवतात, असं म्हणत भाजप आमदार आशिष शेलार यांनी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला.

मुंबई : संजय राऊत यांच्या डोक्यात छत्रपती शिवाजी महाराज कमी आणि अफझलखान व औरंगजेबच सतत असतात. त्यामुळेच त्यांना अफझलखान व औरंगजेब वारंवार आठवतात, असं म्हणत भाजप आमदार आशिष शेलार यांनी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला. आशिष शेलार यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी संजय राऊतांच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर वक्तव्याचा त्यांनी निषेध केला. (Ashish Shelar Slams MP Sanjay Raut On Commenting to PM Narendra Modi)

सवाल औरंगजेबी मानसिकतेचा असेल तर संजय राऊत आणि त्यांच्या पक्षाला आणि उद्धव ठाकरेंना आमचे थेट सवाल आहेत. आपण मुख्यमंत्री असताना याकूब मेमनचे थडगे सजवले गेले. याला औरंगजेबी मानसिकता म्हणणार की नाही? ज्या अफजल गुरूने भारताच्या संसदेवर हल्ला केला त्याच्या समर्थनार्थ दिल्लीमध्ये अफजल तेरे कातिल जिंदा है..हम शर्मिंदा है असे म्हणणाऱ्या लोकांना आपण मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रामध्ये सभेला परवानगी दिली होती की नाही? ही औरंगजेबी मानसिकता आहे की नाही? असे सवाल उपस्थित करत आशिष शेलार यांनी खासदार संजय राऊतांसह ठाकरेंवर टीका केली.

- Advertisement -

“संजय राऊत यांनी केलेले विधान हे पंतप्रधानांचा अपमान करणारे आहे. बदनामी करणारे असून पंतप्रधानांबद्दल विद्वेष पसरवणारे आहे. म्हणून आम्ही निवडणूक आयोगाला त्याची दखल घ्यायला लावू आणि कायदेशीर कारवाईची मागणी करू. भाजपने अफजलखानाच्या कबरीचा बडेजाव उखडून टाकला. भाजपच्या सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टमुद्रा असलेले बोधचिन्ह आमच्या संरक्षण दलाच्या झेंड्यावर, गणवेशावर उमटवले. मात्र संजय राऊत यांच्या डोक्यात छत्रपती शिवाजी महाराज कमी आणि अफझलखान व औरंगजेबच सतत असतात. त्यामुळेच त्यांना अफझलखान व औरंगजेब वारंवार आठवतात. उद्धव ठाकरेंचे सरकार असताना औरंगजेबी मानसिकतेच्या लोकांची चलती होती. हे महाराष्ट्राने आणि देशाने पाहिलेय” अशा शब्दांत आशिष शेलार यांनी टीका केली.


हेही वाचा – Amit Shah : शेपूट घालणं म्हणजे मर्दुमकी नाही; मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -