घरमहाराष्ट्रAshok Chavan : काँग्रेसला महाराष्ट्रात मोठा धक्का देणाऱ्या अशोक चव्हाणांबद्दल जाणून घेऊया...

Ashok Chavan : काँग्रेसला महाराष्ट्रात मोठा धक्का देणाऱ्या अशोक चव्हाणांबद्दल जाणून घेऊया…

Subscribe

मुंबई : दक्षिण मुंबईचे माजी खासदार मिलिंद देवरा यांनी शिवसेनेत, तर अगदी दोन दिवसांपूर्वीच काँग्रेसचे माजी आमदार बाबा सिद्दीकी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित पवार गट) प्रवेश केला आहे. यानंतर आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा आणि विधिमंडळ सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी त्यांचा राजीनामा स्विकारला आहे. अशातच ते भाजपासोबत जाणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. मात्र त्यांनी याबाबत दोन दिवसांत आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. दरम्यान, महाराष्ट्रात काँग्रेसला मोठा धक्का देणाऱ्या अशोक चव्हाणांबाबत जाणून घेऊया… (Lets know about Ashok Chavan who gave Congress a big blow in Maharashtra)

अशोक चव्हाण यांचे वडील काँग्रेसच्या काळा मुख्यमंत्री

अशोक चव्हाण यांचा जन्म 28 ऑक्टोबर 1958 रोजी झाला. अशोक चव्हाण हे नांदेडच्या प्रभावशाली राजकीय घराण्यातील आहेत. ते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचे पुत्र आहेत. राज्याच्या इतिहासात मुख्यमंत्री झालेली पिता-पुत्राची ही पहिलीच जोडी आहे. राजकारणातील बाळकडू त्यांना वडिलांकडून मिळाले.

- Advertisement -

हेही वाचा – Maharashtra Politics : काँग्रसेमुक्त घोषणा देणारे आता काँग्रेसव्याप्त झालेत; ठाकरेंची टीका

1987 मध्ये पहिल्यांदा खासदार 

अशोक चव्हाण यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस म्हणून राजकारणात प्रवेश केला. 1987 मध्ये ते पहिल्यांदा लोकसभेचे खासदार म्हणून निवडून आले. त्यानंतर 2014 मध्ये ते दुसऱ्यांदा लोकसभेचे खासदार झाले. याशिवाय ते एकदा विधानपरिषदेचे सदस्यही होते. त्यांच्या राजकीय कारकिर्दीत ते दोन वेळा खासदार आणि चार वेळा आमदार होते. महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या सरकारमध्ये ते सांस्कृतिक कार्य, उद्योग, खाण आणि प्रोटोकॉल मंत्री होते.

- Advertisement -

विलासरावांच्या राजीनाम्यानंतर अशोक चव्हाण मुख्यमंत्री 

नोव्हेंबर 2008 मध्ये मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यानंतर राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर अशोक चव्हाण यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री करण्यात आले. अशोक चव्हाण हे 8 डिसेंबर 2008 ते 9 नोव्हेंबर 2010 पर्यंत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. 2009 च्या विधानसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी अशोक चव्हाण यांची पुन्हा एकदा राज्याच्या मुख्यमंत्रीपदी निवड केली.

हेही वाचा – Maharashtra Politics : ‘ऑपरेशन लोटस’च्या कार्यपद्धतीवर जनता नाराज; थोरात स्पष्टच बोलले

आदर्श हाऊसिंग सोसायटी प्रकरण गाजले

आदर्श गृहनिर्माण सोसायटी घोटाळा प्रकरणी काँग्रेसने 9 नोव्हेंबर 2010 रोजी अशोक चव्हाण यांचा राजीनामा मागितला होता. विशेष म्हणजे त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप असतानाही 2014 च्या लोकसभा निवडणुकीत नांदेडमधून लोकसभा निवडणूक जिंकली होती. त्यानंतर त्यांची 2015 मध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली. पण 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना नांदेडची जागा भाजपाच्या प्रताप पाटील यांच्याकडून गमवावी लागली.

राहुल गांधी यांचे निकटवर्तीय

अशोक चव्हाण हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांचे निकटवर्तीय मानले जातात. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या पराभवावर अशोक चव्हाण म्हणाले होते की, पक्षाचा पराभव ही सामूहिक जबाबदारी आहे. ही जबाबदारी एकट्या पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांची नाही. त्यामुळे आता अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यामुळे राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसला मोठा धक्का मानला जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -