घरमहाराष्ट्रमोठ्या भावाला सोडले नाही, ते लोकांना काय सोडणार? - अशोक विखे

मोठ्या भावाला सोडले नाही, ते लोकांना काय सोडणार? – अशोक विखे

Subscribe

राधाकृष्ण विखे यांचे ज्येष्ठ बंधू अशोक विखे यांनी अहमदनगर येथे संग्राम जगताप यांच्या प्रचारार्थ मंगळवारी सायंकाळी घेण्यात आलेल्या सभेत एक गौप्यस्फोट केला आहे. 'मोठ्या भावाला सोडले नाही, ते लोकांना काय सोडणार'?, असा सवालही त्यांनी यावेळी केला आहे.

लोकसभा निवडणूकीची रणधुमाळी सर्वत्र पहायला मिळत आहे. निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात प्रचार-प्रसार करण्याची जय्यत तयारी करताना सर्वच राजकीय पक्ष दिसत आहेत. असे असतानाच आज अहमदनगर येथे संग्राम जगताप यांच्या प्रचारार्थ मंगळवारी सायंकाळी घेण्यात आलेल्या सभेत राधाकृष्ण विखे पाटील यांचे ज्येष्ठ बंधू अशोक विखे यांनी एक गौप्यस्फोट केला आहे. ‘मोठ्या भावाला सोडले नाही, ते लोकांना काय सोडणार’?, असा घणाघात अशोक विखे यांनी केला आहे.

काय म्हणाले अशोक विखे

‘कुटुंबात मोठा भाऊ असून देखील वडिल असलेल्या दिवंगत ज्येष्ठ नेते बाळासाहेब विखे यांना अग्नी देऊ दिला नाही, असा आरोप राधाकृष्ण विखे यांचे ज्येष्ठ बंधू अशोक विखे यांनी केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे व्यासपीठावर असतानाच विखे यांनी राधाकृष्ण विखे यांच्यावर हा आरोप केला आहे. अहमदनगर लोकसभा मतदारसंघात राधाकृष्ण विखे यांचे चिरंजीव सुजय विखे हे निवडणूक लढवित आहेत. त्यांचे काका तथा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांचे ज्येष्ठ बंधू अशोक विखे यांना राष्ट्रवादीने व्यासपीठावर बोलावून एकच खळबळ उडवून दिली आहे.

- Advertisement -

वाचा – मुलाच्या पावलावर वडिलांचेही पाऊल; राधाकृष्ण विखे भाजपात करणार प्रवेश?

वाचा – नगरमध्ये राष्ट्रवादीचा प्रचार करणार नाही – राधाकृष्ण विखे पाटील

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -