घरमहाराष्ट्रमुलाच्या पावलावर वडिलांचेही पाऊल; राधाकृष्ण विखे भाजपात करणार प्रवेश?

मुलाच्या पावलावर वडिलांचेही पाऊल; राधाकृष्ण विखे भाजपात करणार प्रवेश?

Subscribe

राधाकृष्ण विखे-पाटील येत्या १२ एप्रिलला मोदींच्या सभे दरम्यान भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सध्या जोर धरत आहे. त्यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसणार आहे.

काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगल्या होत्या. मात्र आता सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राधाकृष्ण विखे-पाटील येत्या १२ एप्रिलला मोदींच्या सभेदरम्यान भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसणार आहे. ‘वडिलांच्या पावलावर मुलांने पाऊल ठेवले’ अशी मराठीमध्ये एक म्हण आहे. मात्र अहमदनगरच्या राजकारणात हे उलटे होताना दिसत आहे. ‘मुलाच्या पावलावर वडिलांनी दिले पाऊल’ असे अहमदनगरच्या राजकारणात म्हणणे वावगे ठरणार नाही. कारण सुजय विखे-पाटील यांच्या भाजपा प्रवेशानंतर आता त्याचे वडील राधाकृष्ण विखे-पाटील हे देखील भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत.

विखे भाजपच्या वाटेवर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अहमदनगरची प्रचार सभा येत्या शुक्रवारी म्हणजे १२ एप्रिलला होणार आहे. सकाळी साडेनऊ वाजता अहमदनगरच्या निरंकारी भवनामागील मैदानात ही सभा होणार आहे. भाजपचे अहमदनगर मतदारसंघातील उमेदवार डॉ. सुजय विखे यांनीच रविवारी जामखेडला या सभेची माहिती दिली होती. जिल्हा भाजपच्या सूत्रांकडूनही त्यास दुजोरा दिला असून या सभेच्या नियोजन बैठका पक्ष स्तरावर सुरू झाल्या आहेत. त्यामुळे आता मोदींच्या सभेमध्ये सुजयनंतर राधाकृष्ण विखे-पाटील देखील प्रवेश करणार असल्याच्या जोरदार चर्चा राजकिय वर्तुळात सुरु आहेत.

- Advertisement -

१२ तारखेला मोदींची सभा

दरम्यान, अहमदनगर मतदारसंघ भाजपच्यादृष्टीने प्रतिष्ठेचा झाल्यामुळे याठिकाणी पंतप्रधान मोदींची सभा घेण्याचे प्रयत्न सुरू होते. सुरुवातीला १५ ते १८ एप्रिल या कालावधीत या सभेची तारीख मिळणार असल्याची चर्चा होती. मात्र, आता येत्या १२ एप्रिलची तारीख निश्चित झाली आहे. दरम्यान, उन्हाचा पारा जास्त असल्यामुळे मोदींची सभा सकाळी साडेनऊ वाजता होणार आहे.

मोदींच्या सभेकडे सर्वांचे लक्ष

दरम्यान, शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभे दरम्यान काँग्रेसचे जेष्ठ नेते राधाकृष्ण विखे-पाटील हे भाजपात प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अहमदनगर दक्षिणेतील लोकसभेची जागा आपल्या मुलाला राष्ट्रवादी काँग्रेसने सोडावी यासाठी राधाकृष्ण विखे-पाटील यांनी खूप प्रयत्न केले. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसने ही जागा न सोडल्याने नाराज सुजय विखे-पाटील यांनी भाजपात प्रवेश केला. त्यानंतर अहमदनगर दक्षिण मतदार संघातून सुजय विखेंना उमेदवारी देण्यात आली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -