घरमहाराष्ट्रमोर्शीतील आघाडीच्या उमेदवारास मारहाण; भाजपच्या उमेदवारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

मोर्शीतील आघाडीच्या उमेदवारास मारहाण; भाजपच्या उमेदवारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

Subscribe

अमरावतीच्या मोर्शी मतदारसंघात आघाडीचे उमेदवार देवेंद्र भुयार यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा जयंत पाटील यांनी निषेध करत हल्ल्यास कारणीभूत सत्ताधारी उमेदवारास अटक करावे, अशी मागणी केली आहे.

‘आघाडाचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार देवेंद्र भुयार यांच्यावर सकाळी प्राणघातक हल्ला करण्यात आला. हा हल्ला घडवून आणण्यासाठी त्यांच्या गाडीवर पेट्रोल टाकून त्यांची गाडी जाळण्यात आली. या जळत्या गाडीतून त्यांना बाहेर काढण्यात आले. भुयार हे विजयी होणार असे चित्र दिसत असतांना भुयार यांच्या विरोधात कृषीमंत्री अनिल बोंडे हे उभे होते. ते विजयी होणार या दडपणाने त्यांच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचे असल्याचा अंदाज आहे. विरोधकांनी निवडणुकी दरम्यान प्राणघातक हल्ला केला. प्रशासनाने या हल्लेखोरांना ताब्यात घ्यावे. त्यांच्यावर योग्य त्या गुन्ह्यांची नोंद करण्यात यावी.’ अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी यावेळी केली.

आज संपुर्ण महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक पार पडत आहे. मात्र अमराती जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अमरावती जिल्ह्यात असणाऱ्या मोर्शी मतदार संघात कृषीमंत्री आणि भाजपाचे उमेदवार अनिल बोंडे यांच्या विरोधात उभे असलेले आघाडाचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार देवेंद्र भुयार हे उभे होते. आघाडाची उमेदवार देवेंद्र भुयार यांच्यावर सकाळी धनोडी वरूड गावापासून ६ किलोमीटर अंतरावर शेंदूरजना घाट या भागात काही अज्ञात लोकांनी प्राणघातक हल्ला केल्याचा प्रकार समोर आला आहे.

- Advertisement -

अज्ञातांनी केलेल्या या प्राणघातक हल्ल्यात देवेंद्र भुयार यांच्या जीवघेणा हल्ला घडवून आणल्यानंतर त्यांची चारचाकी गाडी देखील पेटवून दिली. या गाडीची अवस्था जाळल्यानंतर संपुर्ण राख झालेल्या आवस्थेत बघायला मिळत आहे. या हल्ला घडवून आणलेल्या प्रकारानंतर जखमी झालेल्या देवेंद्र भुयार यांना शेंदूरजना घाट पोलिसांनी अमरावती येथील जिल्ह्यातील सामान्य रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.

- Advertisement -

कार्यकर्त्यांमध्ये संतापाचे वातावरण

यावेळी भुयार यांच्यावर झालेल्या प्राणघातक झालेल्या हल्ल्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. ‘माझ्यावर प्राणघातक हल्ला करण्यापूर्वी वाहनाच्या दिशेने फायर करण्यात आले’, असा आरोप देवेंद्र भुयार यांनी केला. तसेच पोलीस अधीक्षक हरिबालाजी यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात जाऊन देवेंद्र भुयार यांची भेट घेऊन चौकशी केली असून वाहनावर हल्ला करून कार जाळण्यात आली आहे. गोळीबाराचे कुठलेही पुरावे घटनास्थळी आढळले नसल्याची कबुली खुद्द पोलीस अधीक्षकांनी दिली आहे.


उत्सव लोकशाहीचा, देश कर्तव्याचा!
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -