घरताज्या घडामोडीपरप्रांतीय मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांविरोधात अतुल भातखळकरांची तक्रार, पोलिसांना ४ दिवसांचे अल्टिमेटम

परप्रांतीय मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांविरोधात अतुल भातखळकरांची तक्रार, पोलिसांना ४ दिवसांचे अल्टिमेटम

Subscribe

काँग्रेस हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांचे सहाकारी झाल्यामुळे त्यांना अस वाटत असेल बलात्कार, हत्या, दरोडे हे रोहिंग्या, मुस्लिम करता.

राज्यात इथून पुढे परप्रातियांची नोंद ठेवण्याचे महत्त्वाचे आदेश मुख्यमंत्र्यांनी पोलिस यंत्रणेल दिले आहेत. यावरुन भाजप नेते अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात तक्रार केली आहे. समता नगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली असून पुढील ४ दिवसांत याबाबत लेखी उत्तर देण्याचे अल्टिमेटम भातखळकर यांनी दिलं आहे. राज्यातील कायदा सुव्यवस्थेचे अपयश लपवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रांतवादाचा सहारा घेत असल्याचे भाजप नेते अतुल भातखळकर यांनी म्हटलं आहे. परप्रांतीयांच्या मुद्द्यावरुन मंत्रिमंडळात मांडीला मांडी लावणारे धनंजय मुंडे हे कुठल्या प्रांताचे आहेत? असा सवालच अतुल भातखळकर यांनी उपस्थित केला आहे.

भाजप नेते अतुल भातखळकर यांनी माध्यमांशी संवाद साधताना म्हटलं आहे की, दोन समजामध्ये भीती पसरवण्याचा हा प्रयत्न आहे. त्यामुळे भारतीय फौजदारी दंड संहितेच्या कलम १५३ प्रमाणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात खटला दाखल करावा अशी मागणी समता नगर पोलीस स्टेशनमध्ये केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एवढीच विचारणा आहे की, मंत्रिमंडळात मांडीला मांडी लावणारे धनंजय मुंडे हे कुठल्या प्रांताचे आहेत. त्यांच्यावर आरोप करणाऱ्या महिलेला १४ दिवस न्यायालयीन कोठडी सुनावली जात आहे. त्यांच्या घरात छापेमारी करण्यात येते. संजय राठोड प्रकरणाचं काय झाले? त्या मुलीला गर्भपात करावा लागला असून त्या घटनेला ६ महिन्यांचा कालावधी उलटून गेले आहेत. त्याचा रिपोर्ट येत नाही. शिवसेनेचे वसई विरारचे उप शाखाप्रमुख धनंजय गावडे यांच्याविरोधात बलात्काराचा आरोप आहे. याच्यामुळे स्वतःचे अपयश लपवण्यासाठी आणि कायदा सुव्यवस्थेचे अपयश लपवण्यासाठी दुर्दैवाने राज्याचे मुख्यमंत्री हे प्रांतवादाचा सहारा घेत असल्याचा आरोप भातखळकर यांनी केला आहे.

- Advertisement -

ते आता मुख्यमंत्री आहेत. त्यांना घटनेविरोधी आणि कायदा विरोधी बोलता येणार नाही. त्याच्यामुळे आम्ही त्यांच्यावर खटला दाखल करावा अशी मागणी करत आहे. कदाचित काँग्रेस हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांचे सहाकारी झाल्यामुळे त्यांना अस वाटत असेल बलात्कार, हत्या, दरोडे हे रोहिंग्या, मुस्लिम करता. बांग्लादेशी घुसखोर करतात ते सांगायला विसरले कारण त्यांना खुर्ची स्वतःची प्रिय आहे. त्याच्यामुळे या घटनाविरोधी कृत्यामुळे आम्ही त्यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यास सांगितले आहे. असे अतुल भातखळकर यांनी म्हटलं आहे.

पोलिसांना अल्टिमेटम

या प्रकरणातील लढाई पुढेही १०० टक्के सुरु राहील. पोलिसांना सांगितले आहे की, ४ दिवसांत याबाबत लेखी उत्तर मिळालं पाहिजे की तुम्ही माझ्या तक्रारीवर काय करत आहात? जर एफआयआर दाखल करण्यास नकार दिला तर न्यायालयाचे दरवाजे ठोठवणार असल्याचे भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी म्हटलं आहे. भारतीय घटनेविषयी काढी इतकीही आस्था राज्याच्या मुख्यमंत्र्यांना नाही. ना कायद्याची शपथ घेऊन ते त्या ठिकाणी बसलेत त्या कायद्याची चाड नाही. म्हणून मुख्यमंत्री म्हणू शकतात की मी एक झापडं मारीन असा हल्लाबोल अतुल भातखळकर यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

हेही वाचा :  उशीरा का होईना राज ठाकरेंची सूचना मुख्यमंत्र्यांना मान्य, परप्रांतियांची होणार नोंद


 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -