घरमहाराष्ट्रBabanrao Taywade : ओबीसीत फूट? भुजबळ, वडेट्टीवार दिशाभूल करतायत; तायवाडेंच्या आरोप

Babanrao Taywade : ओबीसीत फूट? भुजबळ, वडेट्टीवार दिशाभूल करतायत; तायवाडेंच्या आरोप

Subscribe

नागपूर : कुणबी नोंदी असणाऱ्या व्यक्तींच्या सगेसोयऱ्यांना प्रमाणपत्र देण्यासाठी सरकारने अधिसूचना काढली आहे. मात्र आता या अधिसूचनेवरून उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. अशातच आता राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी दावा केला आहे की, मराठा समाजाच्या सग्यासोयऱ्यांना आरक्षण देण्याच्या मागणीला सरकारने मान्यता दिली असली तरी सरकारने दिलेल्या मसुद्यानुसार ओबीसींवर कुठलाही अन्याय होणार नाही. मात्र मंत्री छगन भुजबळ आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार समाजाची दिशाभूल करत आहेत, असा आरोपही त्यांनी केला आहे. त्यामुळे आता ओबीसी आरक्षणासाठी लढा देणाऱ्या नेत्यांमध्ये फुट पडल्याचे चित्र आहे. (Split in OBC Chhagan Bhujbal Vijay Wadettivar are misleading The allegation of Babanrao Taywade caused excitement)

हेही वाचा – Chhagan Bhujbal on Maratha Reservation : “झुंडशाहीच्या पुढे नमते घेऊन…”, भुजबळांची सरकारवर टीका

- Advertisement -

बबनराव तायवाडे म्हणाले की, मराठा आरक्षणासंबंधी निघालेल्या मसुद्यात सगेसोयरे या शब्दाचा पितृसत्ताक असा उल्लेख केला आहे. सरकारने ओबीसींच्या बैठकीत दिलेला शब्द पाळला आहे, त्यामुळे सगेसोयरेला आमचा विरोध नाही. आजोबा, वडील यांचा पुरावा सापडल्यास आम्ही विरोध करणार नाही. सगेसोयरेमुळे ओबीसींच्या आरक्षणाला धक्का नसल्याने आम्ही विरोध करणार नाही, हे बबनराव तायवाडे यांनी स्पष्ट केले.

बबनराव तायवाडे म्हणाले की, सरकारने मराठा समाजाबाबत काढलेल्या मसुद्यामधील सत्य विजय वडेट्टीवार आणि छगन भुजबळ यांनी समाजासमोर आणले पाहिजे. उगाच राजकीय स्वार्थासाठी त्यांनी समाजाची दिशाभूल करू नये, अशी विनंती त्यांनी केली आहे. तसेच यासंदर्भात लवकरच दोन्ही नेत्यांची भेट घेणार असून त्यांच्याशी चर्चा करणार असल्याचे बबनराव तायवाडे यांनी स्पष्ट केले. याशिवाय सरकारने ओबीसींवर कुठलाही अन्याय होणार नाही अशा शब्द दिला आहे. महसुली प्रमाणपत्रामध्ये ज्यांची मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा अशा नोंदी आहेत, त्यांचाच ओबीसी प्रवर्गात समावेश होणार असल्याचे बबनराव तायवाडे म्हणाले.

- Advertisement -

वास्तविक ओबीसीमध्ये 400 जातींचा समावेश आहे. महसुली प्रमाणपत्रामध्ये ज्या नोंदी सापडत आहेत, त्या आधीपासूनच आहेत. त्या सवलतीचा लाभ घेणार आहे. नागपूर जिल्ह्यात 2 लाख 90 हजार किंवा विदर्भातील 9 लाखांच्यावर सापडलेल्या नोंदी जुन्याच आहेत. त्यामुळे नव्याने ओबीसी प्रमाणपत्र देण्याचा विषय नाही. मात्र, राज्यातील नेत्यांकडून 2 कोटी मराठ्यांचा नव्याने समावेश करण्यात येत असल्याचा संभ्रम समाजामध्ये पसरविला जात आहे. हा गैरसमज पसरिवणे बंद करण्यात यावा, असा इशारा बबनराव तायवाडे यांनी छगन भुजबळ आणि विजय वडेट्टीवार यांना दिला.

हेही वाचा – Budget 2024: जनधन योजनेला महिलांची पसंती; खाते उघडण्यात मारली ‘फिफ्टी’

ओबीसीत दोन गट

दरम्यान, मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊ नये म्हणून ओबीसी संघटना एकवटल्याचे चित्र दिसत असले तरी प्रत्यक्षात या मुद्द्यावरून ओबीसी नेत्यामंध्ये दोन गट पडल्याचे चित्र दिसत आहे. विशेष म्हणजे भुजबळ आणि वडेट्टीवार यांच्यात नेतृत्वाची स्पर्धा सुरू झाली आहे. भुजबळ यांनी रविवारी ओबीसी नेत्यांची बैठक बोलवली होती. या बैठकीत 3 फेब्रुवारीला अहमदनगर येथे सभा घेण्याचा निर्णय झाला. त्यानंतर वडेट्टीवार यांनी मंगळवारी बैठक घेऊन 20 फेब्रुवारीला छत्रपती संभाजीनगरमध्ये विराट सभा घेण्याची घोषणा केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -