घरमहाराष्ट्रछगन भुजबळांबाबत बच्चू कडू यांचे सूचक विधान, म्हणाले - "वरिष्ठांच्या सहमतीशिवाय ते...

छगन भुजबळांबाबत बच्चू कडू यांचे सूचक विधान, म्हणाले – “वरिष्ठांच्या सहमतीशिवाय ते आक्रमक…”

Subscribe

मराठा आरक्षणाबाबत भुजबळांकडून करण्यात येणाऱ्या विधानांबाबत प्रहार जनशक्ती संघटनेचे आमदार बच्चू कडू यांच्याकडून सूचक विधान करण्यात आले आहे. वरिष्ठांच्या सहमतीशिवाय भुजबळ अशाप्रकारे आक्रमक बोलणार नाहीत, असे मत बच्चू कडू यांच्याकडून व्यक्त करण्यात आले आहे.

मुंबई : मराठा समाजाला ओबीसीतून सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या विरोधावरून जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात ओबीसी नेत्यांची महाएल्गार सभा मागील आठवड्यात 17 तारखेला पार पडली. या सभेच्या माध्यमातून सरकारमधील मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार निशाणा साधला. परंतु, यामुळे आता जरांगे पाटील आणि छगन भुजबळ यांच्यामध्ये नव्या वादाला सुरुवात झाली आहे. त्याशिवाय मराठा आणि ओबीसी हा वाद देखील आता यामुळे निर्माण होण्याची शक्यता आहे. छगन भुजबळ मराठा आरक्षणासंदर्भात वादग्रस्त वक्तव्य करत असताना मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री त्यांना आवर का घालत नाहीत असा प्रश्न निर्माण झाला आहे. (Bacchu Kadu’s indicative statement regarding Chhagan Bhujbals)

हेही वाचा – “अडचण वाटत असेल तर लगेच राजीनामा घ्या…”, छगन भुजबळ स्पष्टच बोलले

- Advertisement -

ओबीसींच्या महाएल्गार सभेनंतर संभाजीराजे छत्रपती यांनी छगन भुजबळ यांची मंत्रिपदावरून हकालपट्टी करण्यात यावी, याबाबतची मागणी केली आहे. छगन भुजबळ यांच्यामुळे मराठा वि. ओबीसी असा वाद पेटत असल्याचा आरोप राजकीय वर्तुळातून करण्यात येत आहे. मात्र, भुजबळांकडून करण्यात येणाऱ्या या विधानांबाबत आता प्रहार जनशक्ती संघटनेचे आमदार बच्चू कडू यांच्याकडून सूचक विधान करण्यात आले आहे. वरिष्ठांच्या सहमतीशिवाय भुजबळ अशाप्रकारे आक्रमक बोलणार नाहीत, असे मत बच्चू कडू यांच्याकडून व्यक्त करण्यात आले आहे.

छगन भुजबळ यांच्याबाबत बोलताना बच्चू कडू म्हणाले की, अजित पवार आणि छगन भुजबळ यांची भूमिका एकच आहे. वरिष्ठांच्या सहमतीशिवाय भुजबळ अशाप्रकारे आक्रमक बोलत नाहीत, हे स्पष्ट आहे, असे सूचक विधान त्यांच्याकडून करण्यात आले आहे. तर यावेळी त्यांनी सर्वपक्षीय ओबीसी नेत्यांचे नेतृत्व छगन भुजबळ करत आहेत, या बबनराव तायवाडे यांच्या वक्तव्याबद्दल बोलताना सांगितले की, भाजपा आणि काँग्रेसही ओबीसींचं नेतृत्व करू पाहत आहे. पण भाजपा आणि काँग्रेसवर छगन भुजबळ भारी पडत आहेत. भुजबळांनी या दोघांनाही मागे टाकले आहे. आता ना भाजपा ना काँग्रेस, आता फक्त भुजबळसाहेब हेच ओबीसीचे नेते आहेत.

- Advertisement -

तर गेल्या काही दिवसांपासून छगन भुजबळ यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत आहे. याबाबत आता भुजबळ स्पष्टच बोलले आहे. मी सरकारमध्ये असतानाही चॅलेंज करतो. मी सरकारलाही सांगितले. जिथे बोलायचे तिथे मी बोलतोय. मी मंत्रिपदाचा राजीनामा का देत नाही असे विचारले जाते. परंतु मी माझे नेते अजित पवार यांना सांगितले आहे. जेव्हा कधी तुम्हाला वाटेल छगन भुजबळांची अडचण होतेय. सरकारमध्ये सुद्धा माझ्यामुळे अडचण होतेय. तुम्ही फक्त एक मेसेज पाठवा आणि माझा राजीनामा घ्या..हे मी आता सांगितले नाही तर जेव्हा अंबडला ओबीसींची सभा होती. त्या सभेअगोदर सांगून मी अंबडला गेलो होतो, असा खुलासाही छगन भुजबळ यांच्याकडून करण्यात आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -