घरताज्या घडामोडीठोकताळ्यानंतरच पवारांनी ठाकरेंसोबत सरकार स्थापन केले - बाळा नांदगावकर

ठोकताळ्यानंतरच पवारांनी ठाकरेंसोबत सरकार स्थापन केले – बाळा नांदगावकर

Subscribe

दोन पक्ष प्रयत्नातूनत असतील तर भविष्यात काहीतरी सकारात्मकच घडेल

राजकारणात प्रत्येक गोष्टीचे ठोकताळे असतात. त्यानुसारच राजकीय क्षेत्रात काही गोष्टी ठोकताळ्यानुसार ठरवल्या जातात. शरद पवारांनीही काही ठोकताळ्यानुसारच उद्धव ठाकरे यांच्यासोबत महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतला.त्यानुसारच कोणत्याही गोष्टीची सुरूवात ही होताना काही तरी सकारात्मक दृष्टीने होईल या अनुषंगानेच काही मनसे आणि भाजप या दोन्ही पक्षाच्या बाबतीत येत्या दिवसात निर्णय होऊ शकतो, अशी माहिती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली. मनसे भाजपमध्ये काही सकारात्मक गोष्टी घडल्या तरच भविष्यात काही गोष्टी घडू शकतील असेही संकेत त्यांनी यावेळी दिले. त्यामुळे युतीबाबत लपून छपून काय करायच ? असाही सवाल नांदगावकर यांनी केला. म्हणूनच दोन पक्ष जर एकत्र येण्याचे प्रयत्न करत असतील तर ही आनंदाची गोष्ट असल्याचे नांदगावकर म्हणाले. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यात झालेल्या भेटीनंतर बाळा नांदगावकर हे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. दोघांमध्ये जवळपास ५० मिनिटे भेट झाल्याचेही ते म्हणाले.

गेल्या काही दिवसांमध्ये प्रत्येक पक्ष आपआपल्यापरीने पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहे. इतर पक्षांनी ज्या पद्धतीने पक्ष वाढवण्याची सुरूवात केली आहे, त्यानुसारच मनसेही पक्ष वाढवण्याचे प्रयत्न करत आहे. राज ठाकरे आणि अमित ठाकरे यांनी गेल्या काही दिवसात दौरे सुरू केले आहेत. नाशिक, पुणे याठिकाणचा दौरा हा पक्ष वाढीच्या प्रयत्नाचाच भाग असल्याचेही नांदगावकर यांनी स्पष्ट केलेच. आमच्यासारखच भाजपही पक्ष वाढीसाठी काम करतो. येत्या दिवसात दोन्ही पक्षांकडून जर प्रयत्न सुरू असतील तर त्यामधून काही तरी चांगलच घडेल असेही ते म्हणाले.

- Advertisement -

राज साहेबांच्या रक्तातच हिंदुत्व

राज साहेबांच्या रक्तातच हिंदुत्व आहे. आम्ही हिंदुत्वाचा मुद्दा घेऊनच आतापर्यंत वाटचाल करत आहोत. त्यामुळे आतापर्यंत हिंदुत्वाची भूमिका राज ठाकरेंनी कायम ठेवली आहे. त्यासोबतच उत्तर भारतीयांबाबत मांडलेली भूमिका ही बोरिवलीत झालेल्या कार्यक्रमात मांडण्यात आली होती. या भाषणाचे क्लिप राज ठाकरेंनी नाशिकमध्ये चंद्रकांत पाटलांसोबतच्या भेटीमध्ये शेअर करणार असल्याचे सांगितले होते. राज ठाकरेंच्या भाषणाच्या क्लिप या मनसे नेते संदीप देशपांडे यांनी शेअर केल्या होत्या. या क्लिप चारवेळा पाहिल्यानंतरच चंद्रकांत पाटील हे आज राज ठाकरेंच्या भेटीला आल्याचेही नांदगावकर म्हणाले.

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -