घरमहाराष्ट्र'सनातन'वर बंदी घालण्यास वेळ लागणार - दीपक केसरकर

‘सनातन’वर बंदी घालण्यास वेळ लागणार – दीपक केसरकर

Subscribe

एटीएसने पकडलेले आरोपी हे सनातन संस्थेचे सदस्य असून सनातनवर बंदी घालण्यात यावी यासाठी विरोधकांकडून दबाव वाढत आहे. याबाबत राज्याचे गृह राज्यमंत्री (ग्रामीण) दीपक केसरकर यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, सनातनवर बंदी घालण्यास वेळ लागेल. एखाद्या संस्थेवर बंदी घालायची असेल तर त्याला काहीतरी प्रक्रिया असते. ती प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय बंदी घालता येत नाही असे केसरकर यांनी यावेळी सांगितले.

घाईगडबडीत बंदीची मागणी करू नये

सनातन संस्थेवर बंदी घालण्याच्या प्रस्तावाचे समर्थन करण्यासाठी काही माहिती मिळाली आहे. मात्र ती माहिती पुरेशी नाही. यासाठी आणखी माहिती मिळविण्याचे काम चालू आहे. तसेच कोणत्याही संस्थेविरूद्ध बंदी घालण्याची शिफारस करताना त्याची पूर्ण तयारी करावे लागते. याशिवाय प्रत्येक संस्थेला बंदीविरूद्ध न्यायालयात दाद मागता येते. त्यामुळे बंदीच्या समर्थनार्थ देण्यात येणारी कारणे परिपूर्ण असावी लागतात, असे त्यांनी सांगितले. तसेच ज्यांनी अतिरेकी कारवाया केल्या आहेत, ते समोर आले आहेत. त्यांचा सनातशी संबध आहे की नाही हे अजून सिद्ध व्हायचे आहे. तसेच पकडलेल्या आरोपीविषयी चौकशी सुरू आहे. आम्ही जी कारवाई केली ती २४ तासांच्या आत केंद्र सरकारला पाठवली आहे. मात्र संपूर्ण तपास पूर्ण झाल्यानंतर केंद्राला निर्णय घेता येईल असे त्यांनी सांगितले.

- Advertisement -

Ban on Sanatan Sanstha take a little more time

विरोधकांचा कितीही दबाव असला तरी सनातन संस्थेवर बंदी घालण्यास आणखी वेळ लागेल, अशी प्रतिक्रिया गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले आहे.

Posted by My Mahanagar on Thursday, August 23, 2018

आणखी काय म्हणाले केसरकर

सनातन संस्थेवर बंदी घालण्याचा प्रस्ताव आघाडी सरकारने २०११ साली केंद्राकडे पाठविला होता. त्यावर केंद्राने २०१३ साली काही प्रश्नांची विचारणा केली होती. त्याचे उत्तर राज्य सरकारने २०१५ साली दिले. त्याचप्रमाणे हा प्रस्ताव परिपूर्ण करून केंद्राला सादर केला. आता परत त्यावर स्मरणपत्र पाठविण्यात आले आहे, असेही केसरकर यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -