घर महाराष्ट्र करुणा शर्मा यांच्या गाडीवर मध्यरात्री दगडफेक; कारचा दरवाजाही उघडण्याचा केला प्रयत्न, तपास...

करुणा शर्मा यांच्या गाडीवर मध्यरात्री दगडफेक; कारचा दरवाजाही उघडण्याचा केला प्रयत्न, तपास सुरू

Subscribe

शिंदे सरकारमधील अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे यांच्याशी संबंधित करुण शर्मा यांच्या गाडीवर बुधवारी मध्यरात्री त्यांच्या घराजवळ काही जणांनी हल्ला केला. करुणा यांच्या कारवर दगडफेक करण्यात आली, तसंच त्यांच्या कारचे दरवाजे उघडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करुणा यांनी केला आहे.

बीड: शिंदे सरकारमधील अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे यांच्याशी संबंधित करुण शर्मा यांच्या गाडीवर बुधवारी मध्यरात्री त्यांच्या घराजवळ काही जणांनी हल्ला केला. करुणा यांच्या कारवर दगडफेक करण्यात आली, तसंच त्यांच्या कारचे दरवाजे उघडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करुणा यांनी केला आहे. याप्रकरणी शिवाजी पोलीस ठाण्यात अदाखलपात्रात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Beed Karuna Sharma s car pelted with stones at midnight An attempt was made to open the car investigation is going on)

मागच्या काही दिवसांपूर्वी करुणा शर्मा या बीड शहरात स्थायिक झाल्या आहेत. त्यांनी यासाठी बीडमध्ये नवीन घर देखली घेतलं आहे. दरम्यान, करुणा शर्मा यांच्या बीडमधील घरासमोर लावलेल्या त्यांच्या गाडीवर अज्ञात हल्लेखोराने मध्यरात्री तीन वाजण्याच्या सुमारास हल्ला केला होता. यामध्ये गाडीच्या काचा फुटल्या आहेत. हल्लेखोरांनी गाडीत प्रवेश करण्याचा देखील प्रयत्न केला.

- Advertisement -

करुणा शर्मा या शहरातील कॅनॉल रोडवरील उत्तमनगर भागात राहतात. बुधवारी रात्री त्यांच्या गाडीतून पीए अजयकुमार देडे यांच्यासह त्या मेडीकलवर थायरॉईडचे औषध आणण्यासाठी निघाल्या होत्या. घरापासून काही अंतरावर गेल्यानंतर त्यांना लक्षात आले की, गाडीचा टायर पंक्चर आहे. त्यामुळे परत घरी जाण्यासाठी निघाल्या असता तीन अनोळखी व्यक्ती त्या ठिकाणी आले. त्यातील एकाने गाडीच्या समोरील काचेवर दगड मारला, यात काच फुटली. तर अन्य दोघांनी दोन्ही बाजूचे दरवाजे उघडण्याचा प्रयत्न केला, असा आरोप करुणा यांनी केला आहे.

दोन दिवसांपूर्वी करुणा शर्मा यांनी बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देऊन दुष्काळ जाहीर करण्याची केली आहे. पावसाळा सुरू होऊन तीन महिने उलटले आहेत, मात्र अजूनही अपेक्षित पाऊस झालेला नाही. त्यामुळे शेतकरी हतबल झाला असून, त्यांच्या सर्व अपेक्षा संपल्या आहेत. त्यात पीक विमा देखील मिळत नाही. अशा परिस्थितीत सत्ताधारी सभा आणि आपल्या राजकीय कामातच व्यस्थ आहेत. त्यामुळे बीड जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करण्यात यावा अशी मागणी करुणा मुंडे यांनी केली आहे.

- Advertisement -

( हेही वाचा: ‘भारत जोडो यात्रे’मुळे विरोधकांची स्थिती सुधारली, शरद पवारांकडून राहुल गांधींचे कौतुक )

- Advertisment -