घरमहाराष्ट्रBhai Jagtap : पक्षांत अनेकांना तुच्छ वागणूक, भाई जगतापांचा खळबळजनक दावा

Bhai Jagtap : पक्षांत अनेकांना तुच्छ वागणूक, भाई जगतापांचा खळबळजनक दावा

Subscribe

मुंबई : राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि पक्षाचे नेते अशोक चव्हाण यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा आणि विधिमंडळ सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर पक्षाच्या नेतेमंडळीकडून याबाबत मत व्यक्त करण्यात येत आहे. त्यातच आता मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि विधान परिषदेचे आमदार भाई जगताप यांनी केलेल्या दाव्यामुळे खळबळ उडाली आहे. मुंबई अध्यक्षांकडून आणि प्रदेशाध्यक्षांकडून तुच्छतेची वागणूक दिली जात असल्याची माहिती त्यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिली. त्याशिवाय राष्ट्रीय नेत्यांनी याबाबत आधीच लक्ष घातले असते तर आज पक्षावर ही वेळ आलीच नसती, असेही त्यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे. ( Bhai Jagta sensational claim, Many people are treated with contempt in the Congress party)

हेही वाचा… Ashok Chavan: ‘राजीनामा धक्कादायक’; चव्हाणांच्या पक्षप्रवेशावर वडेट्टीवारांची प्रतिक्रिया म्हणाले, माझ्याशी बोलणं झालं…

- Advertisement -

अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसचे विधान परिषदेचे आमदार भाई जगताप म्हणाले की, इतके मोठे नेते पक्ष का सोडून जातात, याचा काँग्रेस नेतृत्त्वाने गांभीर्याने विचार केला पाहिजे. किंबहुना हा विचार यापूर्वीच करायला पाहिजे होता. चव्हाण यांच्या दोन पिढ्यांनी काँग्रेस पक्षाची सेवा केली, नेतृत्त्व केले. अशोक चव्हाण यांनी अशाप्रकारे जाणे, हा धक्का आहे. काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्त्वाने या गोष्टीचा विचार केला पाहिजे. मुंबई आणि महाराष्ट्रातील काँग्रेस पक्ष सहा महिन्यांपूर्वी बळकट होता. मग गेल्या सहा महिन्यांमध्ये काय घडले, याचा विचार झाला पाहिजे, असे त्यांच्याकडून सांगण्यात आले.

तर, अशोक चव्हाण यांच्यासारखे मोठे नेते पक्ष का सोडून जात आहेत, याचा केंद्रीय नेत्यांनी यापूर्वीच गांभीर्याने विचार करायला पाहिजे होता. हे जे काही घडत आहे, ते पक्षासाठी चांगले नाही. यामुळे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता निर्माण होते. याच अस्वस्थतेतून मुंबईतील काँग्रेसच्या आठ ते नऊ नगरसेवकांनी राजीनामे दिले आहेत. कोणत्याही राजकीय पक्षाचा कार्यकर्ता हा त्याचा विचार जपण्यासाठी पक्षासोबत असतो. तो स्वत:च्या खिशातील पैसे मोजून पक्षाचे काम करतो. त्यामुळे पक्षाचा कार्यकर्ता म्हणजे कोणाचा नोकर नसतो, असेही भाई जगताप म्हणाले.

- Advertisement -

यावेळी त्यांनी खळबळजनक दावा करत म्हटले की, मुंबई काँग्रेसमधील कार्यकर्त्यांमध्ये ही भावना तीव्र आहे. मुंबई अध्यक्ष वर्षा गायकवाड आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडून कार्यकर्त्यांना योग्य वागणूक मिळत नाही. त्यांना तुच्छपणे वागवले जाते. फक्त जवळच्या लोकांचे म्हणणे ऐकले जाते. या सगळ्यामुळे मुंबई काँग्रेसचा माजी अध्यक्ष म्हणून मला पक्षाची प्रचंड चिंता वाटते, अशी खदखद त्यांनी बोलून दाखवली आहे. त्यामुळे आता भाई जगताप यांनी केलेल्या या खळबळजनक वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगू लागल्या आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -