घरमहाराष्ट्रSatyajeet Tambe : खूप काही बोलायचे आहे, पण बोलणार नाही! सत्यजित तांबेंचं...

Satyajeet Tambe : खूप काही बोलायचे आहे, पण बोलणार नाही! सत्यजित तांबेंचं सूचक वक्तव्य

Subscribe

मागील काही दिवसांपासून काँग्रेसमध्ये मोठी फूट पडणार असल्याची चर्चा सुरू होती. काही दिवसांपूर्वी दक्षिण मुंबईचे माजी खासदार मिलिंद देवरा यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर अगदी दोन दिवसांपूर्वीच काँग्रेसचे माजी आमदार बाबा सिद्दीकी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित पवार गट) प्रवेश केला. परंतु, त्यानंतर आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असलेले अशोक चव्हाण यांनीच काँग्रेसचा हात सोडण्याचा निर्णय घेतल्याने काँग्रेसला हा आतापर्यंतचा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे.

मुंबई : राज्यातील राजकारणात आजची सर्वात मोठी घडामोड म्हणजे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी त्यांच्या काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. एवढेच नव्हे तर त्यांनी आमदारकीचाही राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे सुपूर्द केला. या घडामोडीवर काँग्रेसचे विधान परिषदेचे आमदार सत्यजित तांबे यांनी त्यांच्या भावना व्यक्त असून, काँग्रेसच्या या पडझडीबाबत आपल्याला खूप काही बोलायचं आहे, पण बोलणार नाही असंह सूचक विधान त्यांनी केलं आहे. तेव्हा त्यांचा रोख कुणाकडे? असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे. (Satyajeet Tambe So much to say but wont Indicative statement of Satyajit Tambe)

काही दिवसांपासून काँग्रेसमध्ये मोठी फूट पडणार असल्याची चर्चा सुरू होती. काही दिवसांपूर्वी दक्षिण मुंबईचे माजी खासदार मिलिंद देवरा यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर अगदी दोन दिवसांपूर्वीच काँग्रेसचे माजी आमदार बाबा सिद्दीकी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित पवार गट) प्रवेश केला. परंतु, त्यानंतर आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असलेले अशोक चव्हाण यांनीच काँग्रेसचा हात सोडण्याचा निर्णय घेतल्याने काँग्रेसला हा आतापर्यंतचा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे. अशोक चव्हाणांनी सकाळीच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेतल्याने याबाबतच्या चर्चांना उधाण आले.

- Advertisement -

हेही वाचा : TAMILNADU CRISIS : विधानसभेतून राज्यपालांचे वॉकआऊट; अभिभाषणातले मुद्दे वाचलेच नाहीत अशोक चव्हाण यांच्याशिवाय काँग्रेसच्या आमदारांचा मोठा गट हा भाजपात प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. अशातच काही वेळापूर्वीच माध्यमांसमोर येत भाजपमध्ये जाण्याबाबत अद्याप कुठलाही निर्णय घेतला नसून, पुढील दोन दिवसांत आपली राजकीय भूमिका स्पष्ट करणार असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान काँग्रेसमधील या अवस्थेवरुन काँग्रेसचे विधान परिषदेचे आमदार सत्यजित तांबे यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट करत चिंता व्यक्त केली आहे. हेही वाचा : Maharashtra Politics : काँग्रसेमुक्त घोषणा देणारे आता काँग्रेसव्याप्त झालेत; ठाकरेंची टीका

काय म्हणाले सत्यजित तांबे?

काँग्रेसमधील आजच्या राजकीय उलथापालथीनंतर काँग्रेसचे विधान परिषदेचे आमदार सत्यजित तांबे यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंट ट्वीटरवर पोस्ट केली आहे. त्यांच्या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले की, महाराष्ट्रातील कॉंग्रेस पक्षाची स्थिती पाहून मनाला खूप वेदना होत आहेत. ज्या संघटनेसाठी मी आयुष्याचे 22 वर्ष तन, मन, धनाने दिले त्याची ही अवस्था पाहून अस्वस्थ झालोय. खूप काही बोलायचे आहे, पण बोलणार नाही! अशा मोजक्या शब्दांत त्यांनी त्यांची चिंता व्यक्त केली आहे. सोबतच काँग्रेसमधील अंतर्गंत वादावरही त्यांनी सूचक वक्तव्य केलं आहे. आपल्याला खूप काही बोलायचं पण बोलणार नाही! असं लिहिल्याने त्यांचा रोष कुणाकडे आहे याबाबत उलट-सुलट चर्चा रंगत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -