घरमहाराष्ट्रAshok Chavan: 'राजीनामा धक्कादायक'; चव्हाणांच्या पक्षप्रवेशावर वडेट्टीवारांची प्रतिक्रिया म्हणाले, माझ्याशी बोलणं झालं...

Ashok Chavan: ‘राजीनामा धक्कादायक’; चव्हाणांच्या पक्षप्रवेशावर वडेट्टीवारांची प्रतिक्रिया म्हणाले, माझ्याशी बोलणं झालं…

Subscribe

मुंबई: राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र काँग्रेसमधील मातब्बर नेत्यांपैकी एक म्हणून ओळख असलेले ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण हे लवकरच मोठा राजकीय निर्णय घेण्याची शक्यता आहे. त्यांनी आमदारकीचा आणि पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. आता लवकरच ते भाजपात प्रवेश करणार असल्याचं सांगितलं जात आहे. अशातच विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पत्रकारांशी संवाद साधताना वडेट्टीवारांनी अशोक चव्हाण यांनी दिलेला राजीनामा धक्कादायक असल्याचं म्हटलं आहे. तसंच, हा निर्णय त्यांनी का घेतला याचंही कारण स्पष्ट नसल्याचं ते यावेळी म्हणाले. (Ashok Chavan Resignation shocking Vijay Wadettiwar s reaction to Ashok Chavan s party entry said I have spoken to)

नेमकं काय म्हणाले वडेट्टीवार? 

विजय वडेट्टीवार म्हणाले की, अशोक चव्हाण यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांनी राजीनामा दिला हे धक्कादायक आहे. त्यांनी हा निर्णय अचानक का घेतला? याच्यामागे कारण काय? याबाबतही कल्पना नाही. त्यांनी कोणाशी चर्चा केली का हे माहीत नाही, परंतु त्यांनी माझ्याशी चर्चा केलेली नाही.

- Advertisement -

मी त्यांना 2007 पासून ओळखतो. आता जवळपास 17 वर्षे झाली. त्यांच्याशी माझे सलोख्याचे संबंध होते. त्यामुळे मी देखील राजीनामा देणार अशा वावड्या उठत आहेत. मध्यंतरीच्या काळात त्यांच्यामागे चौकशीचा फेरा लागल्याचंही समोर आलं होतं. मात्र त्याबाबत कोणतीही माहिती समोर आली नाही, असंही वडेट्टीवार यांनी स्पष्ट केलं. ते म्हणाले की, ज्या पद्धतीने भाजपा हे फोडाफोडीचं राजकारण करत आहे, ते सर्वसामान्यांना न आवडणारं आहे आणि ते येत्या निवडणुकीत अशा प्रवृत्तींना नक्की धडा शिकवतील.

(हेही वाचा: Satyajeet Tambe : खूप काही बोलायचे आहे, पण बोलणार नाही! सत्यजित तांबेंचं सूचक वक्तव्य)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -