घरमहाराष्ट्रभीम आर्मी प्रमुख चंद्रशेखर आझाद पुण्याकडे रवाना

भीम आर्मी प्रमुख चंद्रशेखर आझाद पुण्याकडे रवाना

Subscribe

भीम आर्मीचे प्रमख असलेले चंद्रशेखर आझाद यांची नजरकैदेतून सुटका करण्यात आली आहे. नजरकैदेतून सुटका झाल्यानंतर चंद्रशेखर आझाद कार्यकर्त्यांसह पुण्याकडे रवाना झाले आहेत.

भीम आर्मीचे प्रमख असलेले चंद्रशेखर आझाद यांची नजरकैदेतून सुटका करण्यात आली आहे. नजरकैदेतून सुटका झाल्यानंतर चंद्रशेखर आझाद कार्यकर्त्यांसह पुण्याकडे रवाना झाले आहेत. न्यायालयानं परवानगी दिल्यास चंद्रशेखर आझाद पुण्यामध्ये सभा देखील घेणार आहेत. आझाद यांच्या पुणे दौऱ्यासाठी पोलिसांचा देखील फौजफाटा मोठ्या प्रमाणात आहे. आझाद यांना मागील तीन दिवसांपासून मालाडमधील हॉटेल मनाली येथे नजरकैदैत ठेवण्यात आले होते. अखेर तीन दिवसांनंतर त्यांची सुटका करण्यात आली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना नजरकैदेत ठेवल्याचं पोलिसांनी सांगितलं. दरम्यान, चंद्रशेखर आझाद हे भीमा – कोरेगाव येथे जाऊन विजयस्तंभाचे दर्शन देखील घेणार आहेत. दरम्यान, पोलिसांनी नजरकैदेमध्ये ठेवल्यानंतर त्यांनी सरकार गळचेपी करत असल्याची टीका केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -