घरमहाराष्ट्रकोरेगाव-भिमाकडे येणाऱ्या भीम अनुयायांना टोलमाफी

कोरेगाव-भिमाकडे येणाऱ्या भीम अनुयायांना टोलमाफी

Subscribe

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या निर्देशानंतर टोलमाफी करण्यात आली आहे. आरपीआयच्या शिष्टमंडळाने टोलमाफीची मागणी केली होती.

कोरेगाव-भिमा येथील विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी दरवर्षी १ जानेवारीला देशभरातून लाखो अनुयायी येत असतात. या भीम अनुयायांसाठी राज्य सरकारने यंदा टोलमाफी दिली आहे. कोरेगाव-भिमा येथे देशभरातून लाखो अनुयायी गाड्या घेऊन येत असतात. त्यांच्यासाठी टोलमाफी करण्यात आली आहे. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या निर्देशानंतर टोलमाफी करण्यात आली आहे. आरपीआयच्या शिष्टमंडळाने टोलमाफीची मागणी केली होती. सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे मागणी करण्यात आली होती. त्यानंतर राज्य सरकारने टोलमाफीचा निर्णय घेतला आहे.


हेही वाचा – कोरेगाव-भिमामध्ये सीसीटीव्ही आणि ड्रोन कॅमेऱ्याची नजर

- Advertisement -

विजयस्तंभ सजावट सुरु 

दरम्यान, शौर्यदिनाचा निमित्त विजयस्तंभ सजावटीची जोरदार तयारी सुरु आहे. विविध रंगाच्या फुलांची माळ तयार करुन विजयस्तंभाची सजावट सुरु आहे. तर कोरेगाव- भीमा येथे उद्या कोणताही अनुच्चित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून खबरदारी घेण्यात आली आहे. आज भर थंडीत पोलिसांची परेड घेण्यात आली. शौर्यदिनाचा कार्यक्रम शांततेत आणि खेळीमेळीच्या वातावरणात व्हावा यासाठी ग्रामस्थांसह प्रशासन गेल्या १५ दिवसांपासून तयारी करत आहेत. पुणे जिल्ह्यात थंडीची मोठी लाट पसरली असतानाही विजयस्तंभ शौर्यदिनासाठी देशभरात विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी अनुयायांनी गर्दी करायला सुरुवात केली आहे. ग्रामस्थांच्या आणि प्रशासनाच्यावतीने ठिकठिकाणी भाविकांसाठी सर्वसुखसुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.


हेही वाचा – चंद्रशेखर आझाद यांच्या पुण्यातील सभेला हायकोर्टाचा नकार

- Advertisement -

चंद्रशेखर आझाद यांच्या सभेला नकार

भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांच्या पुण्यातील सभेला मुंबई हायकोर्टाने परवानगी नाकारली आहे. आज त्यांची सावित्रीबाई फुले विद्यापीठ येथे सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला कोर्टाने परवानगी नाकारली आहे. या सभेच्या माध्यमातून ते आंबेडकरी तरुणाईंशी संवाद साधणार होते. याआधी ३० डिसेंबरला शिवाजीनगर एसएसपीएमएस मैदानावरील चंद्रशेखर यांची सभा नाकारण्यात आली होती. हायकोर्ट आणि पुणे पोलिसांनी या सभेची परवानगी नाकारली होती. दोन्ही सभांना परवानगी नाकारल्यामुळे चंद्रशेखर यांनी कोर्टाकडे दाद मागितली तर कोर्टाने या सुनावणी दरम्यान चंद्रशेखर यांच्या सभेला परवानगी नाकारली आहे. या प्रकरणी पुढील सुनावणी ही ४ जानेवारी २०१९ रोजी घेण्यात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -