घरमहाराष्ट्रउपमुख्यमंत्र्यांच्या नागपुरात शिंदेंचा बोलबोला, रस्त्यांवर लागले भलेमोठे पोस्टर्स

उपमुख्यमंत्र्यांच्या नागपुरात शिंदेंचा बोलबोला, रस्त्यांवर लागले भलेमोठे पोस्टर्स

Subscribe

नागपूर – दोन वर्षांनंतर नागपूरच्या विधान भवनात राज्याचे विधि मंडळाचे हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू झाले आहे. सर्वपक्षीय नेते नागपुरात दाखल झाले असून सत्ताधाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी झाली आहे. महत्त्वाचं म्हणजे, या बॅनर्सवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पोस्टर्स लागले आहेत. महत्त्वाचं म्हणजे या पोस्टर्सवर एकनाथ शिंदे यांचे सुपूत्र खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांचेही फोटो लागले आहेत.

नागपूरच्या विमानतळापासून विधानभवनापर्यंत सर्वं प्रमुख मार्गांवर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळातील इतर सदस्यांचे मोठे फलक लागले आहेत. काही ठिकाणी मोठे कटआऊट्स लावण्यात आले आहेत. वर्धा मार्गावरील उड्डाण पुलावरील रस्ता दुभाजकावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचे मोठाले फलक लावण्यात आले आहेत. यामध्ये खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांचेही छायाचित्र आहे. महत्त्वाचं म्हणजे, नागपूर भागात शिंदे पिता-पुत्रांचं फारसं वर्चस्व नाही, तरीही या दोघांचे पोस्टर असल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

- Advertisement -

श्रीकांत शिंदे हे कल्याण डोंबिवली लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत. मात्र, त्यांचे पिता एकनात शिंदे मुख्यमंत्री बनल्याने श्रीकांत शिंदे यांनाही प्रतिष्ठा मिळत आहे. म्हणूनच, एकनाथ शिंदे यांच्यासोबतच श्रीकांत शिंदे यांचेही बॅनर्स सध्या झळकलेले दिसतात.

नागपुरात शिंदे गटाचा एकही आमदार आणि खासदार नसताना त्यांचेच मोठ्या प्रमाणात फलक दिसत आहेत. उपमुख्यमंत्र्यांचे नागपूर आज भगवेमय झालेलं पाहायला मिळालं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -