घरताज्या घडामोडी'शिवसेना फक्त एकच', आशिष शेलारांच्या विधानानंतर भास्कर जाधव कडाडले

‘शिवसेना फक्त एकच’, आशिष शेलारांच्या विधानानंतर भास्कर जाधव कडाडले

Subscribe

मुंबई – राज्याच्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज शेवटचा आणि तेरावा दिवस आहे. यावेळी शिवसेना नेमकी कोणाची? यावरून विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली. शिवसेना एकच आहे. जी निवडणूक आयोगाने मान्य केली आहे. दुसरी कोणती शिवसेनाच नाही. समान संधी आणि समान न्याय या आधारावर योग्य निर्णय घ्यावा, अशी मागणी भाजप आमदार आशिष शेलार यांनी केली. त्यावर उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव सभागृहात आक्रमक झाले.

या सभागृहात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असा पक्ष रजिस्टर केला आहे का? शिवसेना ही एकच आहे आणि ती येथे आहे. त्या शिवसेनेचं रिप्रेझेंटेशन आहे. मी कायदेशीर बोलतोय. आम्हीच शिवसेना आहोत, असा दावा त्यांच्याकडून केला जातोय. परंतु निवडणूक आयोगाने सांगितलं की, शिंदे गट ही खरी शिवसेना आहे. मग शिवसेना जर एकच आहे आणि त्याचं रिप्रेझेंटेशन जर या समितीमध्ये शिवेसना म्हणून आलं आहे. तर मग शिवसेना उबाठा कुठेय? असा सवाल आमदार आशिष शेलार यांनी सभागृहात उपस्थित केला.

- Advertisement -

हेही वाचा : NCCच्या विद्यार्थ्यांना मारहाण प्रकरण : वडेट्टीवारांनी केलेली कारवाईची मागणी शासनाकडून

शिवसेना उबाठा असा नवीन पक्ष आपण रजिस्टर केला आहे का? त्याची मान्यता आणि गटनेता आपण केलाय का? त्याचं प्रतोद, रिप्रेझेंटेशन केलंय का? उबाठा हा सभागृहात अदृश्य आहे. शिवसेना फक्त एकच आहे. जी तुमच्यासमोर निर्णयासाठी आली आहे. जी निवडणूक आयोगाने आणली आहे. दुसरी कुठली शिवसेनाच नाहीये, असं आशिष शेलार म्हणाले.

- Advertisement -

यावर भास्कर जाधव म्हणाले की, निवडणूक आयोगाने काय निर्णय दिला, याचा संबंध या सभागृहाशी नाही. सुप्रीम कोर्टाने मुख्य प्रतोद सुनील प्रभू आहे सांगितलंय. तर, भरत गोगावले नाहीत. आपलाही निर्णय सुप्रीम कोर्टाने नाकारला आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्टापेक्षा निवडणूक आयोग आणि आशिष शेलार मोठे नाहीत. मूळ शिवसेना ही सभागृहातच आहे. शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादीचं चाललंय, संपूर्ण लोकशाही संपवायचं काम सुरू आहे, असं आमदार भास्कर जाधव म्हणाले.


हेही वाचा : NCCच्या विद्यार्थ्यांना मारहाण प्रकरण : वडेट्टीवारांनी केलेली कारवाईची मागणी शासनाकडून


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -